spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Chinchwad By Poll Election, चिंचवडमध्ये मतदानादरम्यान झाले वाद

कसबा पेठ (Kasbah Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Assembly by-elections) मतदानाला सुरुवात झाली आहे.

कसबा पेठ (Kasbah Peth) आणि चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीच्या (Assembly by-elections) मतदानाला सुरुवात झाली आहे. पोटनिवडणुकीचे मतदान (voting) चालू असताना या पोटनिवडणुकीमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. चिंचवडमध्ये मतदानाच्या दरम्यान राडा झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. चिचवडमध्ये तिरंगा लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे . भाजपच्या पक्षकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे हे उमेदवार चिंचवड मध्ये निवडणूक लढवणार आहे. येणाऱ्या २ मार्च ला या विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीचे मतदान चिंचवडमध्ये सुरु झाले आहे. या पोटनिवडणुकीमध्ये घोडेबाजार सुरु असल्यामुळे १४ पथक तैनात करण्यात आली आहे. आणि या निवडणुकीच्या दरम्यान माजी नगरसेवक सागर अंघोळकर (Sagar Angholkar) आणि राहुल कलाटे (Rahul Kalate) यांच्या समर्थकामध्ये हाणामारी झाली आहे अशी माहिती समोर येत आहे. चिंचवड मधील पिपळे गुरव मतदान केंद्रावर सागर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे समर्थक एकमेकांसोबत हाणामारी करत होते. या दोघांच्या समर्थकांमध्ये धक्काबुकी आणि बाचाबाची झाली. पिपळे गुरव या मतदान केंद्रावर तणाव ग्रस्त वातावरण तयार झाले आहे हा वाद पोलिसांच्या मध्यस्थीनंतर समर्थकांमधील वाद मिटवण्यात आला होता.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत नागरिक माझ्या बाजुने आहेत असा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला होता अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी सुद्धा त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या मी नेहमी साहेबाना मतदान करते आज मी स्वतःला मतदान केले त्यांवेळी मनाला थोडेसे वेगळे वाटले. दरवेळी साहेब असायचे मी त्यांना मतदान करायचे पण आज मी स्वतःला मत देतेय या भावनेने हुरहूर वाटली अशी भावुक भावना त्यांनी व्यक्त केली. चिंचवड विधानसभा मत्तदारसंघामधील २५५ मतदान केंद्रावर वेबकास्टींगच्या सहाय्याने लक्ष ठेवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयातून मतदान केंद्रावर नियंत्रण कक्षातून आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथील नियंत्रण कक्षातून संपूर्ण मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवण्यात आले आहे.

हे ही वाचा :

‘Ghar Banduk Biryani’ मधील ‘गुन गुन’ गाणं आता तेलुगू, तामिळमध्ये प्रदर्शित

अक्षय कुमारचा ‘Selfiee’ पहिल्याच दिवशी ठरला फ्लॉप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss