चित्रा वाघ यांच्याकडून उर्फी जावेदच कौतुक

चित्रा वाघ यांच्याकडून उर्फी जावेदच कौतुक

काही दिवसनपूर्वी उर्फी आणि चित्र वाघ यांचा वाद चांगलाच पेटला होता. पण आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्र वाघ यांनी उर्फी जावेदच (Urfi Javed) कौतुक (appreciation) केलं आहे. आज पुण्यात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या माझा विरोध हा कुठल्या महिलेला किंवा तिच्या धर्माला नव्हताच आणि नाही तो विरोध विकृतीला होता पण आता तुम्ही कौतुक केलं पाहिजे कारण ती महिला आता पूर्ण कपड्यांमध्ये दिसते आहे. कोण सुधारत असेल तर त्याचे कौतुक पण केले पाहिजे. तिने काही ठरवले असेल कारण ती आता चांगल्या कपड्यांमध्ये दिसतेय. मला अनेक जण फोटो पाठवत आहेत त्यामध्ये ती चांगली कपडे घालते आहे तिचं कौतुक केलं पाहिजे. माझं एवढंच म्हणनं आहे की बाई कपडे घाल आणि फिर.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अभिनेत्री उर्फी जावेदला कपड्यांवरुन टार्गेट केलं होतं. उर्फी सार्वजनिक ठिकाणी अतरंगी कपडे परिधान करते, त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याचं चित्रा वाघ यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे उर्फी मात्र काहीच ऐकायला तयार नाही. आपल्याला कपड्यांचं स्वातंत्र्य आहे, असं म्हणत ती पाहिजे तसे कपडे घातल आहे. उलट चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी ट्विट देखील करत होती. पण आता यांच्यातील वादावर पडदा पडला असल्याचे दिसत आहे.

विचित्र कपड्यांवरून प्रसिद्धीस आलेली उर्फी जावेद (Urfi Javed) हिने आपल्या जीवितास धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी महिला आयोगाकडे (Women Commission) उर्फी जावेदने तक्रार दाखल केली आहे. राजकीय स्वार्थापोटी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मला मारहाणीच्या धमक्या दिल्या आहेत. या प्रकरणी महिला आयोगाने आता थेट मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. महिाल आयोगाच्या अध्यक्षा रुपाली पाटील चाकणकर यांनी उर्फी जावेदच्या तक्रारीनंतर पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहलं होतं. सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी आणि त्याचा अहवाल महिला आयोगाला पाठवण्यात यावा, असे आदेश सुद्धा महिला आयोगाने दिले होते.

हे ही वाचा:

भारताचा इंग्लंडवर ७ गडी राखून दणदणीत विजय

रोहित पवारानंतर सुप्रिया सुळे धीरेंद्र कृष्ण महाराजांवर संतापल्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version