Wednesday, September 25, 2024

Latest Posts

पुण्यातील येरवडा कारागृहात दोन कैद्यांमध्ये हाणामारी

पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक विचित्र प्रकार घडत आहेत. पुण्यातील येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला.

पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून अनेक विचित्र प्रकार घडत आहेत. पुण्यातील येरवड्याच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला. आता पुन्हा एकदा जेल मध्ये हाणामारी करण्यात आली. सोमवारी पहाटे एका कैद्याने धारदार टिनच्या तुकड्याने एका अंडरट्रायल कैद्यावर हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक १ मधील बॅरेक क्रमांक ८ मधील मोकळ्या जागेत घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले.

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कारागृहात अंडरट्रायल कैदी रुषभ शेवाळे याच्यावर बारामती येथील रोहन अविदास माने या कैदीने हल्ला केला. शेवाळे याच्या गालावर आणि डोळ्यावर जखम झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच तिथे असलेल्या कारागृहाच्या रक्षकांनी माने याला जबरदस्तीने पकडून धरले. माने याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कलाम ३२४ लावण्यात आला आहे.तसेच धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे येरवड्यातील एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. येरवड्याच्या कारागृहात कैद्यांची संख्या २ हजार ५५६ एवढी झाली आहे. कारागृहामध्ये दुपटी संख्येने कैदी वाढले आहेत. त्यामध्ये झोपण्याच्या जागेपासून आंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात वादावादी होत असते. येरवडायच्या जेलमध्ये न्यालयीन कैद्यांची संख्या जास्त आहे.

काही दिवसांपूर्वी येरवड्याच्या जेलमध्ये दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. जुने कैदी आणि नवीन कैद्यी यांच्यात ही हाणामारी झाली. दगडफेक करत असताना अडवायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला देखील मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे जेलमध्ये सगळीकडे तणावाचे वातावरण आहे. घडलेल्या या सर्व प्रकाराबाबत पोलीस हवालदार हनुमंत मोरे यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पाच कैद्यांवर कारवाई करण्यात आली. समीर शकील शेख, तंरग राकेश परदेशी, निलेश श्रीकांत गायकवाड, पुरुषोत्तम राजेंद्र वीर, देवा नानासो जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्याची नावे आहेत.

Latest Posts

Don't Miss