Crop Insurance Deadline, शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस…

कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना काढण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) काढता यावा म्हणून, राज्य सरकराने १ रुपयांत विमा काढण्याची योजना आणली आहे.

Crop Insurance Deadline, शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस…

कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना काढण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) काढता यावा म्हणून, राज्य सरकराने १ रुपयांत विमा काढण्याची योजना आणली आहे. मात्र, ३१ जुलै पर्यंत पीक विमा काढण्याची मुदत देण्यात आली होती. त्यातच, काही शेतकरी यापासून वंचित राहिल्याने सरकारकडून तीन दिवसांची अतिरिक्त मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळेच आता पीक विमा भरण्यासाठी आजची शेवटची तारीख असून, राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढून घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोग यांसारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे लागवडीनंतर पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य (financial stability) राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे शासनाच्या निर्णयानंतर कर्जदार, बिगर कर्जदार, कुळ किंवा पट्टेदार शेतकऱ्यांना एक रुपया नाममात्र दराने पीक विमा काढता येणार आहे. पीक विमा (Crop Insurance) काढण्यासाठीची शेवटची तारीख ही ३१ जुलै होती, ती तारीख आता केंद्र शासनाने ३ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. त्यामुळेच आता पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे आजचा शेवटचा दिवस शिल्लक आहे.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात १ ऑगस्ट अखेर ५,५, ४९४ शेतकरी यांनी, ३ लाख २० हजार ८२ क्षेत्रावर विमा आपला उतरविला आहे. तर तालुका निहाय शेतकरी संख्या पाहता औंढा नागनाथ ९९ हजार ९७१, वसमत १ लाख १४ हजार ४६९, हिंगोली-९१ हजार ०७१, कळमनुरी-८६ हजार ८२३ आणि सेनगांव १ लाख १३ हजार १६० या प्रमाणे विमा उतरविला आहे. विमा भरण्याची अंतिम दिनांक ३ ऑगस्टपर्यंत असून राहिलेल्या शेतकऱ्यांनी सामूहीक सुविधा केंद्राद्वारे (CSC सेंटर) १ रुपयात आपला विमा भरुन घ्यावा, असे आवाहन आता जिल्हाधिकारी (Collector) जितेंद्र पापळकर यांनी सर्वांना केले आहे.

हे ही वाचा:

पिंपरी-चिंचवड पोलीस भरती घोटाळ्यामध्ये ‘बीडचे कनेक्शन’

PM Modi Pune Visit – लोकमान्य टिळक पुरस्काराने नरेंद्र मोदींना पुण्यामध्ये सन्मानित

केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर ८ ते १० ऑगस्ट दरम्यान संसदेत होणार चर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version