spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यामध्ये सापडले एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह ,आत्महत्या नसून हत्याच असल्याचे उघड

पुणे सध्या गुन्हेगारीचे माहेरघर म्हणूनच ओळखले जात आहे. सध्या पुण्यामध्ये होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अलीकडेच पुण्याच्या दौंड (Daund) तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदीत (Bhima River) सात जणांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यामुळे महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली होती. या ७ जणांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. पण आता या प्रकरणात वेगळाच वळण लागले आहे. कारण पोलिसांच्या तपासानंतर पोलिसांनी आत्महत्या नसून हत्या असल्याचे उघड केलं आहे. पण एकीकडे अंधश्रद्धेतून हे हत्यांकड घडल्याचं म्हटलं जात होत. तर आता कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

पोलिसांना १८ ते २२ जानेवारी या पाच दिवसांमध्ये तब्बल ७ मृतदेह हे भीमा नदीच्या पात्रात आढळले होते. हे सात जण एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले. मोहन पवार, संगीता पवार, मुलगी राणी फुलवरे, जावई श्याम फुलवरे आणि त्यांची तीन मुले अशी या सात जणांची नाव आहेत. पवार कुटुंब हे मूळच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोजमधील आहे. शवविच्छेदन अहवालात अस समोर आल की या ७ जणांचा मृत्यू हा पाण्यात बुडून झाला आहे. यावर पोलिसांनी अधिक तपास केला. त्यावरुन पोलिसांनी ४ जणांवर गुन्हा नोंद करुन अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतांपैकी एक असलेल्या मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार हा काही महिन्यांपूर्वी चुलत भाऊ धनंजय पवारबरोबर त्याची पेरणे फाटा येथे गेला होता. तिथून पुन्हा घरी येताना त्यांचा अपघात झाला. या अपघातात धनंजय पवार याचा मृत्यू झाला. तर अमोल पवार या अपघातात बचावला. यावर धनंजय पवार याच्या कुटुंबियांना धनंजयची हत्या झाल्याचा संशय आला. यावर धनंजयच्या घरच्यांनी मोहन पवार आणि त्यांच्या कुटुंबाला भीमा नदीवर अडवून साठी जणांना नदीत दफेकून दिल.यामध्ये या सातही जणांचा मृत्यू झाला.

मोहन पवार , पत्नी शहाबाई मोहन पवार, जावई शाम फलवरे , मुलगी राणी फलवरे , नातू भैय्या फलवरे , छोटू फलवरे आणि कृष्णा शाम फलवरेसर्वजण , अशी मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

हे ही वाचा:

मुंबई पोलीस अलर्ट मोडवर, उद्या शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट

Republic Day 2023, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील रस्ते राहणार बंद

Microsoft Teams Down भारतात मायक्रोसॉफ्ट टीम्सची सेवा ठप्प, हजारो वापरकर्ते नाराज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss