spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खेळाडूंना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकर देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खेळाडूंचं मानधन तीन पटीने वाढवण्याची घोषणा केली.

खेळाडूंना महाराष्ट्र सरकारमध्ये नोकर देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र केसरी २०२३ चा अंतिम टप्प्यातील लढत आज होत आहे. या अंतिम सामन्यासाठी पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि शिवराज राक्षे हे सज्ज आहेत. थोड्या वेळापूर्वी माती विभातील महेंद्र गायकवाड हा विजेता झाला. पुण्याच्या महेंद्र गायकवाड याच्या सोबत सोलापूरचा सिकंदर शेख याची लढत झाली होती. त्यानंतर आता मॅट विभागातील अंतिम लढत शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये झाली. या लढतीत शिवराज राक्षे याने विजय मॅट विभागातील लढत जिंकली आहे. यातून महेंद्र गाडकवाड याने ६-४ अशा गुणांनी विजय मिळवत अंतिम लढत जिंकली. तर शिवराज याने ८-१ या फरकाने जिंकली. आता महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र आणि शिवराज यांच्यात होणार आहे.

या अंतिम सामन्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार बृजभूषण सिंह, मंत्री चंद्रकांत पाटील, रामदास तडस उपस्थित आहे.यावेळी या स्पर्धेचा अंतिम सामना बघण्यासाठी उपस्थित असणाऱ्या देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी यावेळी या स्पर्धकांचा कौतुक करत या खेळाडूंचं मानधन तीन पटीने वाढवण्याची घोषणा केली. महाराष्ट्र हिंद केसरीला १५ रुपये मानधन मिळणार तर ऑलिम्पिक कुस्ती पटून २० हजर रुपये मानधन मिळणार आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले,”ज्याप्रकारे हे खेळाडू मैदानात कुस्ती करतात त्याच प्रमाणे आम्ही देखील राजकारणात कुस्ती खेळतो. पण आमची कुस्ती टीव्ही च्या स्क्रीनवर चालते. पण या टीव्ही स्क्रीनवरची कुस्तीमधूनही राजकारणात एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनतो, हे आपण बघितलंच”, असा विधान यावेळी त्यांनी केलं. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवून दिल्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिकसाठी मागे पडतोय का अशी शंका निर्माण होते. त्यामुळे “महाराष्ट्र मिशन ऑलिम्पिक ” सुरु करणार असून पुढील ऑलिम्पिकमधील कुस्तीवीर हा महाराष्ट्रामधील असेल”, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

तसेच कुस्तीवीरांना मिळणाऱ्या कमी मंचावर हि त्यांनी भाष्य केलं. यावेळी तो म्हणाले,”राज्यपाल ऑलिम्पिक किंवा जागतिक कुस्ती स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या स्पर्धकांना फक्त ६ हजार मानधन मिळत आता ते मानधन ६ हजार वरून २० हजार रुपये करण्यात येणार आहे. तसेच हिंद केसरी , महाराष्ट्र केसरी , रुस्तम ए हिंद याना केवळ ४ हजार रुपये मानधन दिल जाते ते आता १५ हझये रुपये मानधन देण्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच अर्जुन पुरस्कार विजेत्यांना केवळ ६ हजार रुपये मानधन मिळत ते आता २० हजार करण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. तसेच वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार रुपये मानधन मिळतं ते आता सडे सात रुपये करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

तसेच खेळाडूंना राज्य सरकारकडून निकारी देण्याचं सुद्धा आश्वासन त्यांनी दिल.

Latest Posts

Don't Miss