spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात Chhatrapati Sambhaji Maharaj यांचा पुतळा तयार होण्याआधीच काही भागाला गेले तडे?

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील मोशी परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आणि राज्यातील पहिला 100 फूट उंच कांस्य धातूचा पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळ्याच्या चौथऱ्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र हा पुतळा उभारण्याआधीच महाराजांच्या पुतळ्याचे काही भाग हे मोशी परिसरातील ज्या ठिकाणी स्मारक उभे केलं जात आहेत त्या ठिकाणच्या परिसरात ठेवले असताना महाराजांच्या पायाच्या मोजडीला तडे गेले असल्याचे फोटो आणि व्हिडिओ काही माध्यमांत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या पुतळ्याच्या कामाची चौकशी करत आगामी काळात होणाऱ्या कामाबाबत सर्वपक्षीय समिती गठित करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या अजित गव्हाणे यांनी केली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्टीकरण दिले आहे. असे काहीही झालेलं नाही, ही एक अफवा आहे. तसेच पुतळ्याचे काम अद्याप सुरू झालेलं नाही. टप्प्या-टप्प्याने या पुतळ्याची उभारणी केली जाणार आहे. माध्यमांमध्ये जे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते जिथे पुतळा उभारला जात आहेत त्याठिकाणचे नसून तर ते फॅब्रिकेशन साईटवरील आहेत अशा अफवांवर विश्वास ठेऊ नयेत आतापर्यंत फक्त चौथरा तयार झाला आहे पुतळ्याचे काम झाले नसल्याची माहिती पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते ९ महिन्यांपूर्वी उदघाटन करण्यात आलेल्या मालवण येथील शिवछत्रपतींचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी सकाळी कोसळला. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तांत्रिक समिती नियुक्त करण्याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे. मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.

हे ही वाचा:

छत्रपती शिवरायांची कोणाचीही तुलना होणार नाही म्हणून ही राजकीय माफी । Sanjay Raut | Malvan | Rajkot

Social Media कितीही प्रबळ असले तरीही विश्वासार्हता टिकवण्याचे काम वृत्तपत्र लेखकांकडूनच, Bhushan Gagrani यांची ग्वाही

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss