डॉ. देवेंद्र फडणवीस गृह खात्यावर वचक ठेवण्यात अपयशी, NCP चा तक्रारीचा सूर

डॉ. देवेंद्र फडणवीस गृह खात्यावर वचक ठेवण्यात अपयशी, NCP चा तक्रारीचा सूर

सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागलेली पाहायला मिळत आहे. पोलिसांसमोर कोयता गँगचा उच्छाद सुरु असून पुण्यातील कोयता गँगची पुन्हा धुडगूस पाहायला मिळाली आहे. दोन गटात झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला. पुण्यातील वडगाव शेरीमधली घट येथे ही घटना घडली. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.

पुण्यात कोयता गँगची दहशत कायम असून डॉ. देवेंद्र फडणवीस गृह खात्यावर वचक ठेवण्यात अपयशी ठरल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ट्वीटर अकाउंटवर मांडण्यात आले. पुण्यासह आसपासच्या परिसरात गुंड प्रवृत्तीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून कायदा- सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. वडगाव शेरी परिसरात पोलिसांसमोरच या कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली. खरं म्हणजे परिसरात असे दहशतीचे वातावरण असताना त्या ठिकाणी पोलिसांचे गस्त वाढविणे आवश्यक आहे. मात्र, फक्त एक महिला पोलीस त्या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे; ही राज्याच्या गृह खात्यासाठी अत्यंत शरमेची बाब आहे. मुख्य रहदारीच्या रस्त्यांवरच समाजकंटकांकडून अशा प्रकारे सुरू असलेले दहशतीचे थैमान हे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. पुणे पोलीस प्रशासनासह राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची गांभीर्याने नोंद घेऊन कोयता गँगच्या दहशतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात. असे ट्वीट राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (NCP) कडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पुण्यातील हडपसरमध्ये डंपरने आईसमोर मुलाला चिरडले, मुलाचा जागीच मृत्यू

नाना पाटेकर यांची नाना रुपं; ‘ओले आले’ मध्ये रंगून गेले नाना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version