पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बाहेर सापडले 2 कोटीचे अंमली पदार्थ

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता ड्रग्सच्या विळखेत अडकले आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बाहेर सापडले 2 कोटीचे अंमली पदार्थ

पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे आता ड्रग्सच्या विळखेत अडकले आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर (Pune Crime News) अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे पोलिसांनी सूसन रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून १ किलो ७५ ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्स (Mephidrone drugs) जप्त केले आहे. या रुग्णालयाच्या बाहेर अंमली पदार्थ सापडल्यामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.अंमली पदार्थ विक्रीचं हे हाय प्रोफाईल रॅकेट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणात आरोपी ललित पटेल आणि त्याच्यासह २ तरुण यात सहभागी आहेत.

ललित पटेल हा आरोपी असून ड्रग्सची तस्करी केल्या प्रकरणी याआधी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्याच्यावर येरवडा कारागृहात कारवाई करण्यात आली आहे. ललित पटेलवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. रुग्णालायात उपचार घेत असताना देखील त्याने हे रॅकेट चालवले कसे हा प्रश्न सगळ्याना पडला आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत. मागील काही दिवसांपासून ड्रग्सच्या अनेक धाडी पुण्यात टाकल्या जात आहेत. हे ड्रग्स पुरवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई चालू केली आहे. त्यातच पुण्यातून ५० कोटी रुपयांचा १०१ किलो मेथाक्युलोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील ५ जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने केली होती.

डीआरआयच्या अधिकाऱ्याना एका कार मधून पाच जण मेथाक्युलोन घेऊन पुण्यात येत आहेत अशी माहिती मिळाली. या गोष्टीची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्या पाच जणांना अटक केली आणि वाहन जप्त केले. वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले ४ निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम सापडले आहेत. मेथाक्युलोन हा पदार्थ सापडला आहे. त्यानंतर पोलिअसनी त्या पाच जणांना अटक केली आहे. आरोपी बेकायदा विक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचेदेखील समोर आले होते.

हे ही वाचा: 

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, सिंधुदुर्गात पुढील 48 तास रेड अलर्ट

PMPML बसमध्ये आता UPI पेमेंट सेवा उपलब्ध

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version