spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील जुना बाजारातील दुकानांना भीषण आग, दहा दुकाने जळून खाक

पुण्यातील (Pune) जुना बाजार येथील दुकानांना आज सकाळी अचानक मोठी आग लागली आहे. मंगळवार पेठ असलेले या जुना बाजारमध्ये अनेक वस्तूंची दुकान आहेत.

पुण्यातील जुना बाजार येथील दुकानांना आज सकाळी अचानक मोठी आग लागली आहे. मंगळवार पेठ असलेले या जुना बाजार मध्ये अनेक वस्तूंची दुकान आहेत. यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत.

पुणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ७.३८ वाजता आग लागल्याचा फोन आला. अग्निशमन दलाचे बंब, पाण्याचे टँकरसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामन जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू आहे. मात्र नेमकी हि अहंग नक्की कशामुळे लागली होती याची माहिती अद्याप समजलेली नाही. पुणे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ७.३८ वाजता आग लागल्याचा फोन आला. अग्निशमन दलाचे बंब, पाण्याचे टँकरसह अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या ८ गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अर्धा तास प्रयत्न केल्यानंतर ही आग विझवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं.

समोर आलेल्या माहितीनुसार, जुन्या बाजारातील ७ ते ८ दुकानांना आज सकाळी आग लागली आहे. या भागांमध्ये वायरिंग, इलेक्ट्रिक, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत. प्राथमिक माहितीनुसार या आगीमध्ये सुदैवाने कोणीतीही जीवीतहानी नाही.जुना बाजार हे शहराच्या मध्यभागी गजबजलेले रस्त्याच्या कडेला असलेले बाजार आहे, जे जुन्या किंवा वापरलेल्या वस्तू विकणाऱ्या दुकानांसाठी ओळखले जाते. हे दर रविवारी आणि बुधवारी चालते.

अग्निशामक विभागाचे अधिकारी पंकज जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेतील जुना बाजार येथे आग लागल्याची माहिती सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानंतर घटनास्थळी काही मिनिटांत ८ गाड्या दाखल झाल्या आणि चारही बाजूने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. तर या घटनेमध्ये ८ ते १० दुकानांतील माल जळून खाक झाला आहे. या दुकानांत इलेक्ट्रिक साहित्य आणि मोटारी होत्या. या घटनेमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आग कशामुळे लागली हे अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

हे कायद्याचं राज्य आहे, कोयत्याच नाही!, भाजपने केली जोरदार पोस्टरबाजी

सरकारमध्ये निवडणुका लावण्याची हिंमत नाही, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss