spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात नदीच्या पात्रात पंप सोडताना विजेच्या धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू

पुण्यातील (Pune) भोर तालुक्यातील (Bhor taluka) निगडे गावात नदीपात्रात विद्युत पंपाची मोटार (Electric pump motor) सोडत असताना वीजेच्या धक्क्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरुवारी घडली. या घटनेत वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर निगडे गावात (Nigde village) शोककळा पसरली. अचानक वीजपुरवठा सुरू होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक चौकशीत माहिती मिळाली आहे.

नीरा नदी (Neera River) पात्रातील पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक वीज प्रवाह गायब झाला. त्यावेळी चौघेजण मोटार बसवण्यासाठी पाण्यात उतरले होते. मात्र वीज प्रवाह अचानक सुरू झाल्याने विद्युत प्रवाह पाण्यात उतरला. त्यामुळे या चौघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विठ्ठल सुदाम मालुसरे (Vitthal Sudam Malusare), सनी विठ्ठल मालुसरे (Sunny Vitthal Malusare), अमोल चंद्रकांत मालुसरे (Amol Chandrakant Malusare), आनंदा ज्ञानोबा जाधव (Ananda Gyanoba Jadhav) (सर्व रा. निगडे ता.भोर जि. पुणे) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. अचानक घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हे चौघेजण शेतकरी कुटुंबातील होते. त्यात बापलेकाचा समावेश आहे. घटना स्थळावरून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यास यश आले आहे.

महावितरणामुळेच ही घटना घडली असल्याचे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. घटना घडण्यापूर्वी वीजप्रवाह अधूनमधून खंडित होत होता. विद्युत प्रवाह पाण्यात उतरला आणि या चौघांना आपले प्राण गमवावे लागले. घटनास्थळी राजगड पोलीस (Rajgad Police) दाखल झाले असून पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. नेमकी ही घटना कधी घडली याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून निगडे गावावर शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा : 

कालिचरण बाबाचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

१३ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘वाळवी’ चित्रपटाचे टिझर लॉन्च

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss