पुण्यातील गणेश पेठेत लोखंडी सांगाडा कोसळून चार महिला जखमी

पुणे (Pune) शहरात दहीहंडी (Dahihandi) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. पुण्यातील प्रत्येक चौकात लायटिंग करण्यात आली होती.

पुण्यातील गणेश पेठेत लोखंडी सांगाडा कोसळून चार महिला जखमी

पुणे (Pune) शहरात दहीहंडी (Dahihandi) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. पुण्यातील प्रत्येक चौकात लायटिंग करण्यात आली होती. तर काही ठिकाणी डीजे देखील उभारण्यात आला होता. तर या दहीहंडी उत्सव गणेश पेठेतील पांगुळ आळी येथे लायटिंग करण्यासाठी लावलेला लोखंडी पाईपचा सांगाडा खाली कोसळून पडला. त्यामध्ये तीन महिला आणि एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व प्रकारात मंडळाचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. फरासखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राहुल चव्हाण ,अजय बबन सांळुखे, गोपी चंद्रकांत घोरपडे, सनी समाधान आहिरे या चौघांवार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात काल रात्री साडे बारा वाजता हा सर्व प्रकार घडला. या घटनेत मंदा लालचंद चंगेडिया (वय ६७), निर्मलादेवी नवीन पुनमिया (वय६९), केवलचंद मांगिलाल सोळंकी (वय ६६) आणि ताराबाई केवलचंद सोळंकी (वय ६४) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत गणेश लालचंद चंगेडिया यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मागील दोन दिवसापासून दहीहंडी उत्सवाची तयारी चालू होती. अनेक ठिकाणी मोठ्या आवाजात डीजे लावण्यात आले होते. गणेश पेठेतील पांगुळ आळीमध्ये लोखंडी पाईपचा सांगाडा उभारण्याचे काम चालूं होते. तेव्हा सादडी सदन येथील काही महिला तिकडे गेल्या होत्या. सांगाडा उभारण्याचं काम चालू असताना त्यातील एका खांबाला गाडीचा जोरात धक्का लागला आणि संपूर्ण सांगाडा खाली कोसळला. त्या सांगाड्यातील पाईप लागून चार महिला जखमी झाल्या होत्या. सुरक्षित साधनाचा वापर न करता सिस्टिम उभारण्यात आली म्हणून पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पुण्यात दहीहंडी निमित्त छोटे मोठे अपघात झाल्याचे पाहायला मिळते. बाणेर, बालेवाडी, हिंजवडीसारख्या परिसरातदेखील मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली.तृतीयपंथीय समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी त्याचे नवीन गोविंदा पथक उभारण्यात आले होते. त्यानी ही मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला आहे. काही ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जलोशात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला आहे.

हे ही वाचा: 

ग्रीक चवीच्या काकडीचं करा आता ‘ग्रीक कुकुंबर रायता

राज्यभरात सर्व जिह्ल्यात पावसाची दमदार हजेरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version