पुण्यातील कोकणवासियांसाठी खुशखबर, होळीनिमित्त पुण्यातून सोडणार जादा बसेस

गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी हा सण आला की कोकणवासियांना त्यांच्या गावी म्हणजेच कोकणात जाण्याची ओढ लागले.

पुण्यातील कोकणवासियांसाठी खुशखबर, होळीनिमित्त पुण्यातून सोडणार जादा बसेस

गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी हा सण आला की कोकणवासियांना त्यांच्या गावी म्हणजेच कोकणात जाण्याची ओढ लागले. तेव्हा कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी ही होत असते. हीच गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाकडून एक खुशखबर ही देण्यात आली आहे. चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त पुण्यातून (Pune News) तब्बल ६२ जादा गाड्या सोडण्याचा (ST Buses) निर्णय घेतला आहे. दि. ३ ते ६ मार्च दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत.

चाकरमान्यांची गर्दी ही कोकणात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे त्यांची कोणती गैरसोय होऊ नये म्हणून त्याच्या साठी आता एसटी ही सज्ज झाली आहे. म्हणजेच एसटी महामंडळानेपुणे शहरातून जाडा गाड्या सोडण्याचा निर्णय हा घेतला आहे. स्वारगेट (Swarget) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) स्थानकातून जादा बसेस सोडणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. चिपळूण, दापोली, खेड, गुहागर, महाड या बस स्थानकात पुण्यातून जादा बस सोडण्यात येणार आहे.

तसेच तुम्हाला जर आगाऊ आरक्षण करायचे असेल तर त्यासाठी एसटी महामंडळाच्या https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच Msrtc Mobile Reservation App तिकीट आरक्षित करता येईल. त्याशिवाय, एसटी आगारातून ही या विशेष बसेससाठी तिकीट आरक्षण करता येईल. सुरक्षित प्रवासासाठी एसटी बसेसमधून प्रवास करण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. पुणे शहरांसह मुंबईतील अनेक भागांमधून देखील कोकणात गाड्या या सोडल्या जाणार आहेत. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरीवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी ठिकाणांसाठी या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या अतिरिक्त बसेस दि ३ ते १२ मार्च २०२३ दरम्यान कोकणातील मार्गावरुन धावणार आहेत.

हे ही वाचा : 

‘Bigg Boss 16’चा विजेता MC Stan नक्की कोण आहे?

काँग्रेसमध्ये सुरु झाले अंतर्गत द्वंद्व, नाशिक पदवीधर निवडणुकीनंतर पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version