spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात पावसाचा धुमाकूळ, रेड अलर्ट जाहीर!, शाळांनाही सुट्टी… जाणून घ्या प्रत्येक आतापर्यंतची अपडेट

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे.

Pune Rain Update : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात पावसाची (Pune Rain) तुफान बॅटिंग सुरु आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट आहे. पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन गुरुवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुण्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश काढले आहेत.

पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्तीत पाणी शिरले आहे. संगम पूल पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे. कॉर्पोरेशन जवळील पूल बंद होण्याची शक्यता आहे. तर येत्या काही तासांत पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातून ४० हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केल्यामुळे शाळा बंदचा निर्णय सांगली प्रशासनानेही घेतला आहे. राज्य सरकारचा अलमट्टी धरणाशी पाणी सोडण्याबाबतीत कोणत्याही प्रकारचा समन्वय नाही. शिवाय कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात करण्यात येत आहे,असा आरोप कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने करण्यात आला आहे.तसेच राज्य सरकारने तातडीने अलमट्टी धरणातून पाणी साठा कमी करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणला नाही,तर यंदा देखील सांगलीला महापुराचा फटका बसेल, अशी भीती कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली

पुणे जिल्ह्यातील मुळशी ताम्हणी घाट येथे मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं दरड कोसळलेली आहे. रस्ता बंद आहे. पोलीस अधिकारी स्टाफ, तहसीलदार, प्रांत अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून दरड काढण्याचे काम सुरु आहे. तर पिंपरी चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे.गेल्या १२ तासांत तब्बल ३७४ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने धरणाच्या पाणी साठ्यात १२ तासांमध्ये थेट १० टक्के वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजता धरणाचा पाणी साठा ५७.७० टक्के इतका होता, तो आता ६७.८० टक्के झाला आहे. गेली अनेक वर्षे एका रात्रीत इतका तुफान पाऊस बरसल्याची नोंद नव्हती.

पुणे धरणसाठा

खडकवासला १०० टक्के
टेमघर ५७ टक्के
वरसगाव ६३ टक्के
पानशेत ७६ टक्के

हे ही वाचा:

SANKASHTI CHATURTHI 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

MCA ELECTION : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss