spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Hidden Forts In Pune,पावसाळ्यात या किल्ल्यांना भेट द्यायला विसरू नका

पुणे जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर फिरण्यासाठी पुणे हे एक उत्तम ठिकाण ठरते. पुण्यातील अनेक जागी सुंदर पर्यटन स्थळे पहायला मिळतात.

पुणे जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर फिरण्यासाठी पुणे हे एक उत्तम ठिकाण ठरते. पुण्यातील अनेक जागी सुंदर पर्यटन स्थळे पहायला मिळतात. सह्यद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गडकिल्यांच्या सौंदर्याला पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात अनेक पर्यटक या पर्यटन स्थळांना व किल्ल्यांना भेट देत असतात.तुम्ही ही पावसाळ्यात गडकिल्ल्यांना भेट देण्याचा विचार करत असाल तर या सौंदर्याने नटलेल्या गडकिल्ल्यांना जरूर भेट द्या.

1. किल्ले जीवधन (Jivdhan Fort)

हा किल्ला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आहे. तसेच हा किल्ला खूप जास्त उंचावर आहे ज्यामुळे येथून निर्सार्गाचे एक छान दृश्य पाहायला मिळते. या जागी घनदाट जंगलातून जाताना धुक्याचा एक वेगळाच व अनोखा आनंद घ्यायला मिळतो. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला जुन्नर शहरात जावे लागते मग तेथून हा किल्ला २९ किमी अंतरावर आहे,तर पुण्यातून १२३ किमी आणि मुंबईपासून १२२ किमी आंतरावर आहे.

जीवधन किल्ला | Jivdhan fort History | Spot Hunter

2. वनरलिंगी सुळका (Wanarlingi Sulka)

हा किल्ला जीवधनच्या अगदी लगत असून त्याची उंची जमिनीपासून सुमारे ३८५ फुट आहे. हा सुळका किल्ला पर्यटक आणि ट्रेकर्ससाठी पर्वणीच समजला जातो. सोशल मीडियावर हा किल्ला प्रचंड चर्चेत असून हा वनरलिंगी सुळका पुणे मुंबईपासून प्रत्येकी १३० किमी अंतरावर आहे.दरवर्षी अनेक पर्यटक ट्रेकिंगसाठी या किल्ल्यावर भेट द्यायला येत असतात.

Jivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग » माझी लेखमाला

3. किल्ले चावंड (Chavand Fort)

पुण्यातील उत्तरेकडे असणाऱ्या जुन्नर तालुक्यात हा चावंड किल्ला आहे. या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अवघड असून यावर जाण्यासाठी दगडी पायरीमार्ग आहे. गडावर जात असताना उंचावरुन माणिकडोह धरणाचे विहंगम दृश्य दिसते. हा किल्ला पुण्यातून ११० किमी तर मुंबईपासून १३० किमी आहे.या गडावर असलेल्या सात टाक्यांचा संबंध सप्तमातृकांशी जोडला गेला आहे.

चावंड किल्ला

4. किल्ले हडसर (Hadsar Fort)

हा किल्ला त्याच्या प्रचंड आकारासाठी प्रसिद्ध आहे. गडावर जाताच सर्वप्रथम आपल्याला शिवमंदिराचे दर्शन होते.या किल्ल्याच्या समोर असलेल्या नदीचे दृश्य फारच सुंदर दिसते. पावसाळ्यात या ठिकाणी आल्हाददायक आणि थंडगार वातावरणाचा आनंद लुटता येतो. हडसर हा किल्ला पुणे मुंबईपासून अवघ्या चार तासांच्या अंतरावर आहे.

किल्ले हडसर, ता. जुन्नर जि. पुणे | Hadsar Fort Junnar Tourism in Marathi

5. हटकेश्वर डोंगर (Hatkeshwar Fort)

हटकेश्वर डोंगर याठीकाणी पर्यटक मुख्यतः ट्रेकसाठी येत असून हा डोंगर ट्रेक करण्यासाठी अवघा एक दिवस लागतो. या डोंगरावर दोन सुळक्यांना जोडण्यासाठी दुर्मिळ असा नैसर्गिक पुल आहे. या ठिकाणी आपल्याला आपण क्षितिजसमांतर असल्याचा भास होतो.या ठिकाणी जाण्यासाठी गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गोद्रे गावात जावे लागते. हे ठिकाण पुण्यापासून तीन तास तर मुंबईपासून अवघ्या चार तास अंतरावर आहे.

हटकेश्वर महादेव- जानिए लक्ष्मण जी द्वारा स्थापित किए इस शिवालय की रोचक कथा  - वाह ग़ज़ब

हे ही वाचा:

Trial Period Song Dhappa,जेनेलियाच ‘धप्पा’ गाणं चांगल्याच चर्चेत

अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ च्या संवादावर व दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप

Pune airport, विमानाच्या पायऱ्यांवरून पडून सुरक्षा अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss