चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप सोपवणार ‘या’ नेत्यांकडे जबाबदारी

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप सोपवणार ‘या’ नेत्यांकडे जबाबदारी

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. एकीकडे महाविकास आघाडी या पोट निवडणुकीची रणनीती आखणार असल्याचे अलीकडेच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितलं होत. आणि दुसरीकडे भाजपकडून अद्याप कोणताही उमेदवार या जागांवर जाहीर करण्यात आलेला नाही. तर हि निवडणूक बिनविरोधी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आणि जर निवडणूक झालीच तर या निवडणुकीसाठीची रणनीती पक्षाने तयार केली असल्याचे भाजप आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडून पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची बैठक बोलवण्यात आली होती. ही बैठक विधानसेभेच्या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावेळेस चंद्रकांत पाटील यांनी चिंचवडमधून माध्यमांशी संवाद साधला. आणि बैठकीत काय झाले हे चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सांगितल आहे. चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की “भाजपची आजची बैठक ही उमेदवार निवडीसाठी नव्हती. तर या बैठकीत सांगोपांग चर्चा झाली की, इतर पक्षात काय चाललंय? आणि ते काय करणार आहेत? ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कोणासोबत कशी बोलणी करणं अपेक्षित आहे, याबाबींवर यात चर्चा झाली असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भाजपकडून अद्याप कोण उमेदवार आहे हे स्पष्ट झालेले नाह. चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, “भाजपचे उमेदवार कोण असतील हे ठरवण्याचे अधिकार भाजपच्या कोअर कमिटीकडे आहेत. इच्छुक उमेदवारांची नावं प्रदेशाकडे जातात. प्रदेशाची एक कोअर कमिटी आहे. तर एक पार्लमेंटरी बोर्ड आहे. कोअर कमिटी आणि पार्लमेंटरी बोर्डाकडून ही नावं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडं जातात. त्यानंतर निर्णय दिल्लीतून घोषीत होतो”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

चंद्रकां पाटील यांनी पुढे सांगितल की “म्ही सातत्याने सगळे आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहतो. अन्य पक्षासारखं प्रासंगिक संपर्कात आम्ही कार्यकर्त्यांशी संपर्कात राहत नाही”, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीमुळे जेएनयूनंतर आता जामियामध्ये गोंधळ, ४ विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

जुनी पेन्शन योजना लागू करण्याची ‘धमक’ होती तर फडणवीस आतापर्यंत झोपले होते का?, अतुल लोंढे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version