पिंपरी चिंचवडमध्ये एकापाठोपाठ नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, ३ स्कूल बस जळाल्या

पिंपरी चिंचवड मध्ये रविवारी एकाचवेळी नऊ गॅस टाक्यांचा स्फोट (Pune Gas Tank Blast) झाल्याची घटना घडली.

पिंपरी चिंचवडमध्ये एकापाठोपाठ नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, ३ स्कूल बस जळाल्या

पिंपरी चिंचवड मध्ये रविवारी एकाचवेळी नऊ गॅस टाक्यांचा स्फोट (Pune Gas Tank Blast) झाल्याची घटना घडली. या घटनेमध्ये एक धक्कादायक कारण समोर आले आहे. ही आग चोरीची घटना घडत असताना झाला आहे. ज्या ठिकणी हा गॅस टँकरचा स्फोट झाला त्याच्या आजूबाजूला शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांचे हॉस्टेलसुद्धा आहे. गॅस चोरी करत असताना एकापाठोपाठ नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग स्फोट झाल्यामुळे नागरिकांनी पळापळ कार्याला सुरुवात केली. या आगीचा भडका वाढल्यामुळे गॅस चोरी करणाऱ्यांनी तिथून पळ काढला.ज्या भागात आग लागली तिथे शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशीही राहतात. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण शाळेच्या तीन गाड्या जाळून खाक झाल्या आहेत.

रविवारी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास ही आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बारा वाजले. तसेच आग लागल्यामुळे अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरु होते. आग विझल्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोधही सुरू आहे. गॅसच्या टाकीला आग लागल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे काही भागात गर्दी झाली होती. या स्फोटामुळे नागरिक घाबरले होते. स्फोटाच्या आवाज होताच अनेक जण रस्त्यावर आले. आग लागलेल्या परिसरात शाळा, कॉलेज असल्यामुळे विद्यार्थ्यांचे हॉस्टेलही आहे. तसेच काही विद्यार्थी स्फोटचा आवाज ऐकून बाहेर आले. त्यामुळे रस्त्यावर गर्दी झाली होती.

गॅसच्या टाकीचा एकामागोमाग एक स्फोट झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. पण या घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

हे ही वाचा: 

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक; अविनाश जाधवांना पोलिसांनी घेतले ताब्यात

विधान सभेच्या ५ राज्यांच्या निवडणूक जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version