पुण्यात विद्यार्थिनींनी केली फ्री स्टाईल हाणामारी

पुणे (Pune) शहराला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात. याच शिक्षणाच्या माहेरघरात दहावीतील विद्यार्थिनींमध्ये तुफान हाणामारी झाली आहे.

पुण्यात विद्यार्थिनींनी केली फ्री स्टाईल हाणामारी

मुलांची हाणामारी हि बहुतेकदा होत असते. आपण प्रत्येक ठिकाणी बघत देखील असतो. परंतु तुम्ही कधी मुलींची फ्री स्टाईल हाणामारी पहिली आहे का ? अशीच घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC) घडली आहे. आणि त्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल होत आहे. पुणे (Pune) शहराला शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात. याच शिक्षणाच्या माहेरघरात दहावीतील विद्यार्थिनींमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. एका महिलेने मध्यस्थी केल्यामुळे हा वाद काही काळात थांबला.शाळेतील किरकोळ वादावरून ही भांडणं झाल्याचं बोललं जात आहे. परंतु हाणामारीचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही .

दोन्ही मुली टायरच्या दुकानासमोर हाणामारी करताना दिसत आहे. एकमेकांचे केस धरून दोघीही एकमेकांवर तुटून पडलेल्या दिसत आहे. त्यांची हाणामारी सोडवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता. परंतु काही वेळ त्या ऐकायला तयार नव्हत्या. काही वेळानी दोघींचा वाद सोडवण्यासाठी एक महिला आली आणि तिनं मध्यस्थी केल्यानंतर वाद शमला. यावेळी रस्त्यावरील अनेकांनी गर्दी केल्याचं व्हिडीओत (Viral Video) दिसत आहे.

सध्या शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांमध्ये छोट्या छोट्या कारणावरुन वाद झाल्याच्या घटना समोर येत आहे. अश्या अनेक घटनांचे व्हिडीओदेखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकदा शाळेकडून या घटनेची दखल घेतली जाते. मात्र घटनांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. त्यासोबतच महाविद्यालयीन मुलांमध्ये देखील असे प्रकार समोर येतात. हेच नाही तर पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी पिंपरी शहरातून समोर आला होता. तो व्हिडीओदेखील झटक्यात व्हायरल झाला होता.

हे ही वाचा:

जम्मूच्या नरवाल परिसर बॉम्बस्फोटाने हादरला, ३० मिनिटांच्या अंतराने झाले दोन स्फोट, ७ जण जखमी

Pathan Advance Booking बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ ची जादू, ऍडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी केली लाखोंची कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version