झारखंड सरकारच्या निर्णयाचा जैन धर्मीयांकडून विरोध, आज पुण्यात बंदची हाक

पुण्यातील प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेला लक्ष्मी रस्त्यावर आज तुरळक गर्दी पहायला मिळत आहे.

झारखंड सरकारच्या निर्णयाचा जैन धर्मीयांकडून विरोध, आज पुण्यात बंदची हाक

झारखंड सरकारने गिरिडीह जिल्ह्यातील जैन समाजाचे पवित्र स्थळ असलेल्या श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयावर जैन समाजाने नाराजी व्यक्त केली आहे.

पुण्यातील जैन धर्मियांची १५,००० दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. पुण्यातील प्रमुख बाजार पेठ म्हणून ओळख असलेला लक्ष्मी रस्त्यावर आज तुरळक गर्दी पहायला मिळत आहे. जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सम्मेद शिखरला पर्यटन स्थळाचा दर्जा दिल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील अनेक दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत.

या निर्णयाच्या निषेधार्थ पुण्यातील जैन समाजाने आज भारत बंदची हाक दिली आहे. पुणे येथील जैन समाजाने आपली दुकाने बंद ठेवण्याची घोषणा केली आहे, अशी माहिती श्री गोडवड संघाचे अध्यक्ष फतेहचंद रांका आणि सचिव गणपत मेहता यांनी दिली. हे पवित्र स्थान पारसनाथ टेकडीवर स्थित आहे, जो झारखंड राज्यातील सर्वात मोठा पर्वत आहे आणि दिगंबरा आणि श्वेतांबरा संप्रदायांसाठी महत्त्वपूर्ण आहे कारण २४ पैकी २० जैन तीर्थंकरांनी या ठिकाणी मोक्ष प्राप्त केला होता.

लोकसभेत खासदार श्रीरंग बारणे यांनी नुकतेच मंदिराला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास त्याचे पावित्र्य नष्ट होऊ शकते, अशी घोषणा केली. शासनाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा व पर्यटकांमुळे पवित्र स्थळाच्या पर्यावरणाला बाधा पोहोचू नये, अशी मागणी समाज बांधवांकडून होत आहे.

हे ही वाचा:

वर्षाच्या सुरुवातीलाच मुबईकरांचा खिसा होणार रिकामा !, वीजबिल आणि पाणीपट्टीत होणार ‘ इतक्या’ टक्यांनी वाढ

राज्यातील शासकीय रुग्णालयांची स्थिती गंभीर,पुरेसा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा दूर करण्याची अजित पवार यांची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version