कसबा पोटनिवडणूक जाहीर अन् भाजपकडून आचारसंहितेचा भंग

भाजपवर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आता प्रशासन जाणिवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतंय का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

कसबा पोटनिवडणूक जाहीर अन् भाजपकडून आचारसंहितेचा भंग

सध्या कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. कसबा पेठ विधानसभेची निवडणूक ज्या दिवसापासून जाहीर झालीय त्या दिवसापासून पुणे आणि चिंचवड या भागांमध्ये आचारसंहिता जाहीर लागू करण्यात आली आहे. पण अशातच निवडणुकींसाठी आपली कंबर कसून असलेला पक्ष म्हणजेच भाजपने (भारतीय जनता पार्टी) निवडणूक ऐन तोंडावर आली असताना आचारसंहितेचा भंग केला असल्याचे समोर येत आहे. भारतीय जनता पार्टीकडून जाणीवपूर्वक हा भंग केला असल्याचे म्हंटले जात आहे. कारण, कसबा मतदारसंघात भाजपाचे चिन्ह असलेले झेंडे दिसून आले आहेत.

दरम्यान प्रशासनाकडून भाजपच्या या कृत्यावर अजूनपर्यंत आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. भाजपवर कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आता प्रशासन जाणिवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतंय का असा प्रश्न उपस्थित होतो आहे. कसबा पोटनिवडणुकीमुळे पुणे आणि चिंचवड मतदारसंघात आचारसंहिता जाहिर झालेली असताना भाजप पक्षाचे झेंडे तेथे झळकत आहेत. आचार संहिता सुरू असताना झेंडे लावले असताना कोणतीही कारवाई किंवा गुन्हा दाखल न झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) उमेदवार उभे करण्याची शक्यता असल्याने, मुक्ता टिळक यांच्याकडे असलेली जागा राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. कसबा पेठच्या विद्यमान भाजप आमदार आणि भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागा रिक्त झाल्या आहेत. लक्ष्मण जगताप यांनी चिंचवडचे प्रतिनिधित्व केले. पण आता या जागेसाठी प्रत्येक पक्ष आपला उमेदवार उभा करत असल्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा:

मराठमोळा गश्मीर महाजनी दिसणार एका नव्या ढंगात, रिम शेख आणि करण कुंद्रासोबत झळकणार ‘या’ नव्या मालिकेत

भारताबाहेरही पसरतेय पठाणची क्रेझ, भारत दौऱ्यापूर्वी ‘ह्या’ खेळाडूने शेअर केला पठाण लुकमधील मनोरंजक व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version