spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

KASBA BYPOLL ELECTION RESULTS 2023, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा दणदणीत विजय

भाजपच्या बालेकिल्ल्यात आता काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय हा झाला आहे.

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक (Kasba and Pimpri Chinchwad by-elections) या पहिल्या दिवसापासून वादात आहे. या दोन्ही निवडणुकीच्या प्रचार सभेत कधी वाद झाले तर निवडणुकीच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील कऱण्यात आले. या दोन्ही ठिकाणी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान हे पार पाडले आहे. तर आज दिनांक २ मार्च रोजी या मतमोजणी पार पडत आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात आता काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय हा झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Time Maharashtra (@timemaharashtra)

गेल्या ३० वर्षानंतर भाजपचा बुरुज ढासळला आहे. कसबा मतदारसंघात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. रवींद्र धंगेकर यांनी ११ हजार ४० मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभूत केलं आहे. रवींद्र धंगेकर याना ७३,१९४ मत मिळावी आहेत तर हेमंत रासने याना ६२२४४ मत मिळाली आहेत.

पहिल्या फेरीपासूनच १५०० हजार मतांच्यावर आघाडी घेऊन धंगेकर यांनी दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपला तब्बल ३० वर्षानंतर कसबा हातातून गमाववं लागतं की काय असं चित्रं निर्माण झालं आहे. तसेच कसबा पोटनिवडणुकीत नवव्या फेरीत धंगेकर यांना ३४ हजार ७७८ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ३२ हजार २७२ मते मिळाली आहेत. आनंद दवे यांना १०० मतांवरच समाधान मानावे लागले आहे. नवव्या फेरीत धंगेकर यांना ४५०६ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे धंगेकर हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.

कोण आहेत रवींद्र धंगेकर? –

कसब्यामध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे भाजपचे हेमंत रासणे यांच्या विरोधात होते.अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्याकडे तगडे उमेदवार म्हणून पाहिले जात होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कसब्यातून निवडून आलेले भाजपचे तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांच्याविरोधात त्यांचा अल्पशा फरकाने पराभव झाला होता. रवींद्र धंगेकर तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. धंगेकर हे राज ठाकरे यांचे विश्वासू राहिले आहेत. रविंद्र धंगेकर हे ५ वेळा नगरसेवक असून त्यांनी पुणे महानगरपालिकेत शिवसेना आणि मनसेचे २ वेळा प्रतिनिधित्व केलं आहे. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. मनसेमध्ये असताना धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू होते.

हे ही वाचा :

Pune By-Poll Results 2023 LIVE Updates, पुण्यातील जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या प्रत्येक अपडेट

अश्विनी जगताप ह्यांची आघाडी कायम , नाना काटे टक्कर देऊ शकतील का ?

Kasba ByPoll election Results 2023, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे धंगेकर, पहिल्या फेरीपासून आघाडीवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss