spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kasba ByPoll election Results 2023, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे धंगेकर, पहिल्या फेरीपासून आघाडीवर

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक या पहिल्या दिवसापासून वादात आहे. या दोन्ही निवडणुकीच्या प्रचार सभेत कधी वाद झाले तर निवडणुकीच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील कऱण्यात आले.

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक (Kasba and Pimpri Chinchwad by-elections) या पहिल्या दिवसापासून वादात आहे. या दोन्ही निवडणुकीच्या प्रचार सभेत कधी वाद झाले तर निवडणुकीच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील कऱण्यात आले. या दोन्ही ठिकाणी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान हे पार पाडले आहे. तर आज दिनांक २ मार्च रोजी या मतमोजणी होत आहे. कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत. भाजपच्या बालेकिल्ल्यात आता काँग्रेसची घोडदौड बघायला मिळत आहे.

कसबा मतदार संघात कांटे की टक्कर बघायला मिळत आहे. कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. दहाव्या फेरीपर्यंत रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. ही जनतेची आघाडी आहे. जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे ते मतांच्या रुपात आपल्याला दिसत आहे, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे भाजपचे हेमंत रासने हे शंकर महाराज समाधी मठात ध्यानाला बसले आहेत.

पहिल्या फेरीपासूनच १५०० हजार मतांच्यावर आघाडी घेऊन धंगेकर यांनी दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपला तब्बल ३० वर्षानंतर कसबा हातातून गमाववं लागतं की काय असं चित्रं निर्माण झालं आहे. तसेच कसबा पोटनिवडणुकीत नवव्या फेरीत धंगेकर यांना ३४ हजार ७७८ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ३२ हजार २७२ मते मिळाली आहेत. आनंद दवे यांना १०० मतांवरच समाधान मानावे लागले आहे. नवव्या फेरीत धंगेकर यांना ४५०६ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे धंगेकर हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा :

Pune By-Poll Results 2023 LIVE Updates, पुण्यातील जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या प्रत्येक अपडेट

अश्विनी जगताप ह्यांची आघाडी कायम , नाना काटे टक्कर देऊ शकतील का ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss