पुण्यातील कोयता गॅंगने हॉटेल चालकावर केला हल्ला

मागील काही दिवसांपासून पुण्यात अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत बघायला मिळत आहे.

पुण्यातील कोयता गॅंगने हॉटेल चालकावर केला हल्ला

मागील काही दिवसांपासून पुण्यात अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत. पुण्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोयता गॅंगची दहशत बघायला मिळत आहे. यामुळे सगळीकडे काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हॉटेलच्या ( Pune Koyta Gang) बिलावरून तीन जणांच्या टोळक्याने हॉटेल चालकावर थेट कोयता उचला. ही घटना सोमवारी पुण्यात घडली. पुण्यातील अनके ठिकाणी कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. या प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही महिन्यांपासून पुण्यात काहींना काही कारणामुळे कोयता गँग दहशत माजवण्याचा प्रकार सुरु आहे.

पुण्यातील कोयता गॅंग मागील काही दिवसांपासून पुण्यात दहशत माजवत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होत आहे. पुण्यात घडलेली ही घटना सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली आहे. हॉटेल मालक आणि कोयता गॅंग मधील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. सुरुवातीला दोघेही हॉटेल मालकाला पैसे देतात पण त्यानंतर ते अरेरावी करायला सुरुवात करतात. कोयता गॅंगमधील दोघांमध्येच भांडण होताना दिसत आहे. त्यानंतर ते थेट कोयता उचलतात. हे सर्व सीटीटीव्हीत दिसत आहे. भर रस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच परिसरातदेखील दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

 पुण्यात मोठ्या प्रमाणावर कोयता गँगची दहशत आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील त्यांच्या विरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस ही टोळी जिथे दहशत माजवेल त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावरून वरात काढत आहेत. तसेच पुण्यातील पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. ते गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. आत्तापर्यंत सात ते आठ वेळा कोयता गँगची भररस्त्यात धिंड काढण्यात आली आहे. तसेच यापुढेही काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

हे ही वाचा: 

क्रिकेटर्सच्या ग्लोव्हज आणि हेल्मेटची किंमत ऐकून व्हाल थक्क, जाणून घेऊयात किंमत आणि ….

उल्हासनगर मध्ये घडला धक्कादायक प्रकार, दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version