पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस सुरूच, वृद्ध जोडप्याला जीवे मारण्याचा केला प्रयत्न

या हल्ल्या दरम्यान जखमी झालेले ज्येष्ठ नागरिक एका मोकळ्या मैदानात आपल्या कुटुंबासोबत झोपले असताना, कोयता गॅंगने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर येत आहे.

पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस सुरूच, वृद्ध जोडप्याला जीवे मारण्याचा केला प्रयत्न

पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंगने हैदोस घातला आहे. या टोळीमुळे पुण्यात दहशतीच वातावरण निर्माण होत असताना आता एक नवीन घटना समोर आली आहे. यावेळी या टोळीने एका वृद्ध जोडप्यावर हल्ला केल्यामुळे पुणेकरांमध्ये चांगलंच घाबराहटीचं वातावरण निर्माण झालं आहे. या हल्ल्या दरम्यान जखमी झालेले ज्येष्ठ नागरिक एका मोकळ्या मैदानात आपल्या कुटुंबासोबत झोपले असताना, कोयता गॅंगने त्यांच्यावर हल्ला केल्याचे समोर येत आहे. कोयता गॅंगच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना लगेचच नजीकच्या दवाखान्यात हलवण्यात आले. पण, कोयता गँगच्या या वाढत्या दहशतीमुळे आता पुण्यातील ज्येष्ठ नागरिक असुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. .

जुन्या भांडणातून झाला हल्ला…

या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव सतीश काळे असून एका जुन्या भांडणाचा राग मनात ठेऊन त्यांच्यावर या टोळीने हल्ला केल्याची बाब आता समोर येत आहे. सतीश काळे आणि त्यांची पत्नी या दोघांवर ते गाढ झोपेत असताना कोयता गॅंगने त्यांच्यावर हल्ला केला आहे. पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील एका मोकळ्या भागात घडलेली हि घटना आहे. चार महिन्यांपूर्वी सतीश काळे यांचे चार तरुणांशी एका शुल्लकशा कारणावर भांडण झाले होते आणि त्याचाच राग मनात ठेवून त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. दाद्या बगाडे, दिपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर हि या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

कोयता गॅंगने केलेल्या या हल्ल्याची बातमी पुण्यात अगदी वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सतीश काळे त्यांची पत्नी आणि मुलांसह शिवाजीनगर भागातील ज्या परिसरात झोपले होते तो फारच निर्जन असल्यामुळे या तरुणांना त्यांच्यावर हल्ला करणे सहज शक्य झाले. त्यामुळे पोलीस कोयता गँगच्या अनेक गुन्हेगारांना जरी ताब्यात घेत असले तरी त्याचा या टोळीवर काहीही फरक पडताना दिसत नाही.

हे ही वाचा:

अनेक अभिनेत्र्यांना मागे टाकणारे सौंदर्य असणाऱ्या स्मृति मंधानाचा क्रिकेट मधील प्रवास घ्या जाणून

बाबर आझमचे कथित खाजगी व्हिडिओ आणि व्हॉट्सअॅप चॅट झाले लीक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version