Lonavala Bhushi Dam News: एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह सापडले तर दोघे अजूनही बेपत्ता; बचावपथकाचे शोधकार्य अजूनही सुरूच

लोणावळ्याजवळील (Lonavala) भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरात काल (रविवार, ३० जून) पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Lonavala Bhushi Dam News: एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह सापडले तर दोघे अजूनही बेपत्ता; बचावपथकाचे शोधकार्य अजूनही सुरूच

Lonavla Bhushi Dam News: लोणावळ्याजवळील (Lonavala) भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरात काल (रविवार, ३० जून) पावसाळी पर्यटनासाठी गेलेल्या एका कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाहून गेलेल्यापैकी तीन जणांचे मृतदेह सापडले असून अद्याप दोनजण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अजूनही शोधकार्य चालू असून जिल्हाधिकारी सुहास दिवसे हे घटनास्थळी पोहोचले आहेत.

लोणावळा येथे दरवर्षी पावसाळी पर्यटनासाठी हजारो लोक येत असतात. येथील प्रसिद्ध भुशी डॅम येथेहि पर्यटक भेट देतात. अश्यातच पुण्यातील हडपसर येथी अन्सारी कुटुंबीय पावसाळी पर्यटनासाठी लोणावळा येथे गेले असता भुशी डॅमजवळील डोंगरातील धबधब्यातून दहा जण वाहून गेले. धबधब्यात अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहाने दहा जण वाहून गेले यातील पाच जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यास यश आले यात चार जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. शोधकार्य करणाऱ्या पथकाला तिघांचे मृतदेह मिळाले असून अजून दोन जण बेपत्ता आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये शाहिस्ता लियाकत अन्सारी (३६), अमिमा आदिल अन्सारी (१३) आणि उमेरा आदिल अन्सारी (८) यांचे मृतदेह सापडले असून अदनान सदाहत अन्सारी (४) आणि मारिया अकील अन्सारी (९) हे दोघे अजूनही बेपत्ता आहेत. बचावकार्य पथक आणि नौसेनेच्या डायव्हर्स यांचे काल उशिरा रात्रीपर्यंत बचावकार्य चापलू होते. आज सकाळपासून पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले आहे.

लोणावळ्यात रविवारी ५० हजारांहून अधिक पर्यटक

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले कि, अनुमानानुसार रविवारी ५० हजारांहून अधिक पर्यटक लोणावळा येथे सुट्टी घालवण्यासाठी पोहोचले होते. पोलिसांच्या चेतावणीनंतरही लोक धोकादायक क्षेत्रांमध्ये जात असतात. त्यामुळे, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अश्या घटना घडतात.

हे ही वाचा:

Mumbai Graduate Constituency : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निकालात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version