Maharashtra and Karnataka Border Dispute पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्यांना फासलं काळं

Maharashtra and Karnataka Border Dispute पुण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या गाड्यांना फासलं काळं

बेळगावात (Belgaum) महाराष्ट्राच्या (Maharashtra) वाहनांची तोडफोड करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका (Kannad Rakshan Vedika) संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटक सरकारच्या आडमुठे धोरणावर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goovernment) बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीका ठाकरे गटाने वारंवार केली आहे. आता कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यानंतर ठाकरे गटानेही आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : 

Vedant Marathe Veer Daudale Saat मराठी चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला फर्स्ट लुक अक्षय कुमारनं केला शेअर

हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी फोन करून यां घटनेचा निषेध केला. हे होत असताना आता पुण्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्यातील स्वरगेट बस स्ठानकावर जावून कर्नाटक परिवहन मंडलच्या गाड्यांना काळे फासले पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल जात आहे.

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पेटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर (Maharashtra Karnataka border) पुन्हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर कोगनोळी जवळ शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पोलीसही सीमेवर तैनात आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.

बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्या संधर्भात उदय सामंतांची प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून बेळगाव आणि सीमाभागाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वक्तव्ये करून चिथावणी दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. कर्नाटक सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावे अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलतील असेही त्यांनी म्हटले. शंभूराज देसाई यांनी या दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दौरा पुढे ढकलला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी असेही त्यांनी म्हटले. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांसोबत आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Exit mobile version