spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Mahavikas Aghadi चा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही, Amol Kolhe यांचे बाप्पाकडे मागणे

Ganeshotsav 2024: केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-विदेशातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी मनोभावे प्रार्थना केली. पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेल्या गणेशोत्सवाची उज्वल परंपरा त्याच दिमाखात पुढे सुरू ठेवण्याचे काम अनेक मंडळांकडून केले जाते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Shrimat Dagadusheth Halwai Ganapati Trust) गणपती ट्रस्टचे नाव या परंपरेत नेहमीच अग्रस्थानी घेतले जाईल. मंडळाची हीच उज्वल परंपरा यापुढेही सुरू राहावी अशा सदिच्छा खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, त्यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांना व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माध्यमांशी संवाद साधला असता डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी विविध विषयांवर भाष्य केले. विधानसभेसाठी शरदचंद्र पवार (Sharadchandra Pawar) सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल असे यावेळी डॉ.अमोल कोल्हे म्हणाले. बाप्पाकडे काय प्रार्थना केली, याबाबत उत्तर देतांना खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, बाप्पाकडे हेच मागितलं की, महाराष्ट्रावरील गुलाबीचं, फुला-फुलाचं, भ्रष्टाचाराचं, महिलांच्या असुरक्षिततेचं संकट दूर होऊ दे!

यासोबतच, सर्वसामान्य तरूणांचे स्वाभिमानी सरकार येऊ दे, हीच मागणी बाप्पाकडे मागितली असल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. महायुती (Mahayuti) च्या ज्या काही योजना येतात, त्या योजनांची नावे वेगवेगळी आहेत. कालच वर्षा बंगल्यावरील एक देखावा पाहिला. महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली आहे. चांगल्या गोष्टींचे कौतुक झाले पाहिजे, असे मत अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) चा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा जन मानस काय हे सगळ्यांनाच माहीती आहे. शरदचंद्र पवार (Sharadchandra Pawar) सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल, असे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा:

नागपूर अपघातप्रकरणावरून मविआ नेत्यांमध्येच जुंपली; ठाकरे गटाच्या Sushma Andhare आणि काँग्रेसचे Vikas Thakre यांच्यात नवा वाद

जर Mahavikas Aghadi चे सरकार आलं तर सगळ्या योजना बंद पडतील: Chandrashekhar Bawankule

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss