spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र केसरी २०२३, कोण होणार महाकेसरी? एकाच तालमीतील मल्लांमध्ये होणार चुरशीची लढत

महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र आणि शिवराज यांच्यात होणार आहे.

महाराष्ट्र केसरी २०२३ चा अंतिम टप्प्यातील लढत आज होत आहे. या अंतिम सामन्यासाठी पुण्याचा महेंद्र गाडकवाड आणि शिवराज राक्षे हे सज्ज आहेत. थोड्या वेळापूर्वी माती विभातील महेंद्र गायकवाड हा विजेता झाला. पुण्याच्या महेंद्र गायकवाड याच्या सोबत सोलापूरचा सिकंदर शेख याची लढत झाली होती. त्यानंतर आता मॅट विभागातील अंतिम लढत शिवराज राक्षे आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये झाली. या लढतीत शिवराज राक्षे याने विजय मॅट विभागातील लढत जिंकली आहे. यातून महेंद्र गाडकवाड याने ६-४ अशा गुणांनी विजय मिळवत अंतिम लढत जिंकली. तर शिवराज याने ८-१ या फरकाने जिंकली. आता महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत महेंद्र आणि शिवराज यांच्यात होणार आहे.

पुण्यातील स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत महाराष्ट्रातील ६५ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु आहे. यातील दोन्ही गटातील अंतिम सामने झाले आहेत. आता अंतिम लढत जिंकून कोण महाकेसरी होणार याकडे सर्वच लक्ष लागून आहे.

मॅट विभागातील अंतिम लढ्यात शिवराजने आधीपासूनच आघाडीवर होता. ही आघाडी त्याने शेवटपर्यंत कायम ठेवली. पहिल्या फेरीत शिवराजचा विरोधी स्पर्धक हर्षवर्धन सदगीर याला एकही गुण मिळवता आला नाही, तर दुसऱ्या फेरीत सुद्धा हर्षवर्धनला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे शिवराज याने ही लढत ८-१ अशा फरकाने जिंकली आणि अंतिम लढतीत धडक मारली.

माती विभागातून महेंद्र गायकवाड याने बाजी मारली आहे. याने पहिल्यापासूनच सिकंदरवर आघाडी कायम ठेवली होती. अंतिम लढतीत सिकंदर याला चार तर महेंद्रला सहा गुण मिळाले. त्यामुळे ६-४ अशा फरकाने महेंद्र याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत धडक मारली.

शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव करतो. तर महेंद्र गायकवाड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामधील शिरसीचा आहे. तो देखील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडेच सराव करतो. आज अंतिम लढत ही एकाच तालमीतील मल्लांमध्ये होणार आहे.

Latest Posts

Don't Miss