spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गणपती विसर्जननिमित्त पुणे वाहतुकीत मोठे बदल, १७ रस्ते वाहतुकीस बंद

आता गणपती विसर्जनाच्या दिवशी देखील शहरात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे. याच निमित्ताने पुणे वाहतूक पोलि‍सांकडून वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.

मुंबईसह पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणपती विसर्जनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यानिमित्ताने गणेश मंडळाकडून संपूर्ण बंदोबस्त करण्यात आला आहे. गणपती पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी केली आहे. आता गणपती विसर्जनाच्या दिवशी देखील शहरात गणेश भक्तांची गर्दी पाहायला मिळणार आहे. याच निमित्ताने पुणे वाहतूक पोलि‍सांकडून वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.

पुणे शहरातील गणेशोत्सव अंतिम टप्प्याकडे आल्यामुळे गणेशोत्सवात उभारलेले भव्य देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली आहे. यामुळे पुणे शहरातील मुख्य रस्ते संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी २७ ठिकाणी सोय करण्यात आली आहे. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. मध्यभागातील प्रमुख १७ रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. १६ सप्टेंबर) मध्यरात्रीनंतर शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मंगळवारी (दि. १७ सप्टेंबर) रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे. मिरवणूक सुरु होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बागडे रस्ता, गुरु नानक या रस्त्यांवरील वाहतूक मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

MTDC तर्फे World Tourism Day निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, ‘पर्यटन : शांतता’ हे यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य

या कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन; शिवसेना खासदारांचे पत्र, आनंद आश्रमात पैसे उधळणाऱ्यांवर कारवाई काय?

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss