मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; गौतमी पाटील

नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिने तिच्या नृत्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे; गौतमी पाटील

नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिने तिच्या नृत्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गौतमीने तिच्या अभिनयामुळे अनेकांची मने घायाळ केली आहेत. आज पुण्यातील एका परिषदेमध्ये गौतमीने मराठा आरक्षण, आगामी चित्रपट आणि हिंदवी पाटील यांसारख्या अनेक विषयांवर चर्चा केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मला देखील आरक्षण हवंय,असे देखील गौतमीने यावेळी बोलताना सांगितले.

मराठा आरक्षणाबद्दल विचारल्यानंतर गौतमी पाटील म्हणाली, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. साहजिक आहे आज अनेकांना आरक्षण हवंय तर ते मिळेलच पाहिजे. मला देखील आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय. कोरोना काळात माझी ही परिस्थिती खूप हालाखीची होती. हे क्षेत्र चालायला हवं. सध्या सगळं नीट सुरू आहे, असे गौतमी पाटील म्हणाली आहे. गौतमी पाटीलसोबतच आता हिंदवी पाटीलची सुद्धा लोकप्रियता वाढत चालली आहे. मी अकरा वर्षापासून या क्षेत्रात काम करते. अनेक मुली माझ्या हाताखालून गेल्या आहेत. हिंदवी पाटीलचं देखील चांगलं होवो.आमच्यातून कोण फुटून गेलं तर आम्ही त्याला गद्दार अजिबात नाही म्हणत. उलट त्यांचं चांगलं होऊ दे, असं आम्ही म्हणतो.

गौतमी पाटील राजकारणात एंट्री करणार का यावर बोलताना गौतमी म्हणाली, अजिबात राजकारणात जाणार नाही. तिचा घुंगरू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटांमध्ये काम करताना गौतमी नृत्यक्षेत्र सोडणार का? असा प्रश्न देखील अनेकांना पडला आहे. त्यावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली, नवा चित्रपट मिळाला तर करेन पण मी चित्रपट मिळाला तरी डान्स करणे सोडणार नाही. गौतमीचा घुंगरु या चित्रपटामधील अभिनय बघायला प्रेक्षक उत्सुक आहेत.’घुंगरू’ या चित्रपटात गौतमी पाटीलसोबत बाबा गायकवाड देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १५ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

हे ही वाचा:

हिरव्या पालेभाज्या दीर्घकाळ कशा साठवायच्या याच्या काही टिप्स जाणून घ्या

वर्ष संपेपर्यंत हे मेसेज तुमच्याही डोळ्यासमोर नक्कीच येतील पण यामध्ये तथ्य आहे का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version