Thursday, July 4, 2024

Latest Posts

Monsoon Session 2024: पुण्यातल्या पबवर आता ‘एआय’ची नजर, Devendra Fadnavis यांची घोषणा

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर (Pune Hit & Run Case) आता पुण्यातील सर्वच पब सरकारी यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. पुण्यातल्या ७० पबचे परवाने रद्द केल्यानंतर आता पुण्यातल्या पबमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिन्स कॅमेरे लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज २८ जून रोजी  विधानसभेत केली.

पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये एका अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून पोर्शे कार सुमारे ११० किमी मीटर ताशी वेगाने चालवली होती. या पोर्शे कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे अनिष अवधिया व अश्विनी कोस्टचा दुर्देवी मृत्यु झाला होता. या घटनेंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्य पावसाळी अधिवेशातही उमटले. या विषयावर उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सुचनेवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अतिशय सविस्तरपणे उत्तर दिले. हा अल्पवयीन मुलगा ११० किमी वेगाने पोर्शे कार चालवत होता. या घटनेनंतर सरकारने कठोर पावले उचलली आहेत. हा अल्पवयीन मुलगा घरातून निघाल्यापासून पबमध्ये जाईपर्यंतचे संपूर्ण सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकडे आहे. मुलगा अल्पवयीन असूनही पबपमध्ये मद्य दिल्यावरून पबच्या व्यवस्थापकावर कारवाई केली आहे. असे प्रकार घडू नयेत म्हणून आता पबमध्ये ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अनेबल’ (Artificial Intelligence) कॅमेरे बसवण्यात येणार आहे. पब किती वाजता बंद केला, मद्य देताना ग्राहकाचे वय तपासले कि नाही, पबमध्ये प्रवेश देताना ग्राहकाचे वय तपासले अथवा नाही याची सर्व नोंद या कॅमे-यात होईल. प्रवेश देताना ग्राहकाचे वय तपासले नसेल तर सबंधित पबचा परवाना रद्द होईल आणि फौजदारी कारवाईही होईल  अशी माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावर (Pune Hit & Run Case) बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आपला मुलगा प्रौढ नाही, हे माहित असूनही वडिलांनी त्याला गाडी चालवायला दिली. म्हणून ज्युवेनाईल जस्टिस कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ज्या मॅनेजर्सनी त्यांना दारु दिली, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला गुन्हा अंगावर घ्यायला सांगितला. तो पोलिसांकडे गेला, मी गाडी चालवत होता म्हणून सांगितलं. पण पोलिसांनी मान्य केलं नाही. आजोबांनी ड्रायव्हरला कोंडून ठेवलं. पण त्याने गुन्हा मान्य केला नाही. वडिल आणि आजोबांवर किडनॅपिंगची केस लावली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या विधानसभा परिषदेत दिली.

हे ही वाचा

विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार विरोधी बाकांवर असतील – महेश तपासे

Maharashtra Interim Budget 2024: Ajit Pawar यांनी केले सादर, शेतकऱ्यांसाठी काय केले जाणून घ्या…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss