विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच, MPSC विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक तूर्तास रद्द

एमपीएससी परीक्षेच्या नवीन पेपर पॅटर्न विरोधात विद्यार्थ्यांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. २०२५ पासून नवीन पेपर पॅटर्न लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे.

विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच, MPSC विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक तूर्तास रद्द

एमपीएससी परीक्षेच्या नवीन पेपर पॅटर्न विरोधात विद्यार्थ्यांनी सध्या आक्रमक पवित्रा घेतला आहे. २०२५ पासून नवीन पेपर पॅटर्न लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. या संदर्भात MPSC विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज शरद पवारांसह (Sharad Pawar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांना भेटणार होते. मात्र आजची ही भेट रद्द करण्यात आली आहे. सलग चौथ्या दिवशीही विद्यार्थ्यांचं आंदोलन हे पुण्यात सुरूच आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार होते. परंतु ही भेट अचानक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने आजची भेट रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे. नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी हे आंदोलन सुरु आहे. चार दिवसांपासून पुण्यात चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर या भेटीतून मार्ग निघेल अशी अपेक्षा होती. मात्र ही मुख्यमंत्र्यांसोबतची ही बैठक अचानक रद्द करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला न जाता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी आज दिवसभर पुण्यातच थांबणार असल्यान ही बैठक रद्द करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांसोबत सामान्य प्रशासन आणि इतर विभागांचे अधिकारी उपस्थित राहणेही आवश्यक आहे.

सोमवारपासून दि २० फेब्रुवारीपासून पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. दोन महिन्यातील हे तिसरं आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, हा निर्णय घेऊन तीन आठवडे उलटले असूनसुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. अधिकृत नोटीस काढल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी माडंली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा तेव्हा आम्हाला फक्त आश्वासन दिलं गेलं. पण अधिकृत नोटीस निघाली नसल्याची मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुणे शहरात दोन दिवस राहतात. मात्र, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटायला येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

MPSC की निवडणूक आयोग, मुख्यमंत्र्यानी दिले स्पष्टीकरण

IND VS AUS च्या तिसऱ्या मालिकेमध्ये इंदोरचे मैदान ठरेल का भारतासाठी लकी?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version