Mukta Tilak यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (mukta tilak) अनंतात विलीन झाल्या आहेत. पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर आज (२३ डिसेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

Mukta Tilak यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mukta Tilak : भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (mukta tilak) अनंतात विलीन झाल्या आहेत. पुण्याच्या नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर आज (२३ डिसेंबर) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. मुक्ता टिळक यांचं काल (२२ डिसेंबर) दीर्घ आजाराने निधन झालं होतं. मागील ५ महिन्यापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या अखेर त्यांची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.

टिळकांची पणतसून म्हणून १९९२ मध्ये मुक्ता टिळक यांनी राजकारणात प्रवेश केला होता. त्यानंतर त्या १७ वर्ष नगरसेवक होत्या. अडीच वर्ष त्या पुण्याच्या महापौर होत्या. त्यानंतर २०१९ मध्ये कसबा मतदारसंघातून त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. अनेक वर्षांची मोठी राजकीय कारकीर्द असल्याने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या नेत्यांसह, कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील गर्दी केली होती.

मुक्ता टिळक यांचं पार्थिव सकाळी ९ ते ११ पुण्याच्या ऐतिहासिक केसरी वाड्यात दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर उपस्थित होते. “मुक्ता टिळकांचं निधन आमच्यासाठी अत्यंत दुखाची बातमी आहे. पुण्याच्या सामाजिक राजकीय पटलावर संघर्षशील नेतृत्व म्हणून आपण त्यांचा अनुभव घेतला आहे. नगरसेवक, महापौर आणि आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं. टिळकांचा वासरा त्यांनी चांगला निभावला. सामान्य कार्यकर्तीपासून मोठ्या पदावर स्वत:च्या मेहनतीने पोहचल्या. कल्पक आणि चांगल्या वक्त्या होत्या. त्या अर्ध्या वाटेत सोडून जातील असं वाटलं नव्हत. राज्यसभेच्या आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी रुग्णवाहिकेतून त्या मतदानासाठी आल्या होत्या. पक्षाला आवश्यकता असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचं निधन म्हणजे पक्षाची मोठी हानी आहे,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी शोक व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शैलेश टिळक, कुणाल टिळक, श्रुतिका टिळक, चैत्राली टिळक-भागवत, हर्षद भागवत, रोहित टिळक, दीपक टिळक, प्रणिती टिळक उपस्थित होते. त्यासोबतच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार प्रवीण दरेकर, माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

हे ही वाचा:

Sajid Khan चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने त्याने बोलावलं आणि…., मराठी अभिनेत्रीनं साजिद खान बाबत केला खुलासा

आदित्यनंतर उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ, दिशा सालियन प्रकरणात गुप्तचर विभागाकडून होणार चौकशी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version