New Year celebration वर्षाच्या शेवटी पुण्यातील प्रमुख रस्ते राहणार बंद

नववर्षाच्या (new Year) स्वागतासाठी पुणेकर (Pune) सज्ज झाले आहेत. पुणेकरांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक प्लॅन केले आहेत. ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता अनेक पुणेकर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडतात.

New Year celebration वर्षाच्या शेवटी पुण्यातील प्रमुख रस्ते राहणार बंद

Pune New Year celebration : नववर्षाच्या (new Year) स्वागतासाठी पुणेकर (Pune) सज्ज झाले आहेत. पुणेकरांनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक प्लॅन केले आहेत. ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता अनेक पुणेकर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडतात. यात तरुणांचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. थर्टी फर्स्ट जोमात साजरा करण्याची तयारी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील दोन रस्ते पुणे पोलिसांनी ‘नो व्हेईकल’ झोन घोषित केले आहेत.

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता (एफ सी रोड) आणि महात्मा गांधी रस्ता (एम जी रोड) वाहनांसाठी बंद राहणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री गर्दीचा आढावा घेऊन वाहनांसाठी हा रस्ता बंद करण्यात येणार आहे. एफसी रोड तसेच एमजी रोड या दोन्ही रस्त्यांवर ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात तरुणाई एकत्र येते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. यामुळे हे दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनी ब्रेथ अ‍ॅनालायझर वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही तपासणी झाल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे तरुणांना अतिउत्साहीपणा महागात पडण्याची शक्यता आहे. ३१ डिसेंबर शनिवार आणि १ जानेवारी रविवार आल्याने पुण्यात जोरदार सेलिब्रेशन होणार आहे. नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यातील सर्वजण सज्ज झाले आहेत. त्यात कोरोनामुळे मागील दोन वर्ष ३१ डिसेंबरला निर्बंध घालण्यात आले होते. यावर्षी निर्बंधमुक्त नव्या वर्षाचं स्वागत करता येणार आहे. त्यामुळे अनेकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण दिसत आहे.

दरवर्षी मोठ्या उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. यंदाही त्याच उत्साहात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक नागरिक आतुर आहेत. पुणे जिल्ह्यातील १ लाख ६५ हजार नागरिकांना मद्यप्राशन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एका दिवसासाठी परवाने दिले आहेत, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांचं ३१ डिसेंबरचं सेलिब्रेशन जोरात होणार आहे.

या दिवशी तरुणाई मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन करतात. त्यानंतर गाडीवरुन प्रवास करतात. त्यांच्यामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे “ड्रिंक अँड ड्राईव्ह” करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या वाहनचालकांना १००० रुपये दंड तसेच वाहन देखील जप्त करण्यात येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

विधानपरिषदेत झालेल्या गोंधळानंतर सुषमा अंधारेंनी केला मोठा दावा, शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना अडचणीत आणणं हे फडणवीसांचं षडयंत्र

ज्या प्रकारे त्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत, यांना भाजप तर टाचणी लावत नाही ना? उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला सवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version