Saturday, July 6, 2024

Latest Posts

खासदार Nilesh Lanke कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला, राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड

निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून (Ahmadnagar Loksabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) निलेश लंके (Nilesh Lanke) हे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आता एक मोठी बातमी येत असून निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार निलेश लंके हे आपल्या विजयानंतर अनेक लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. सध्या ते पुणे दौऱ्यावर असून पुण्यात देखील त्यांनी अनेक लोकांच्या भेटी घेतल्या. अश्यातच (गुरुवार, १३ जून) त्यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी गजा मारणेकडून निलेश लंकेचा सत्कारही करण्यात आला. यामुळे ता राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत. याअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गजा मारणे याची भेट घेतली होती. त्यामुळे मोठा वादंग झाला होता. अजित पवार यांनी त्यावेळी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली होती. आता निलेश लंके यांनीदेखील गजा मारणेची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चाना सुरुवात झाली आहे.

कोण आहे गजा मारणे?

गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. त्याचे पूर्ण नाव गजानन मारणे असून तो मारणे टोळीचा म्होरक्या आहे. गजा मारणेवर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून त्याने जेलची हवादेखील खाल्ली आहे. गजा मारणे हा मूळचा पुण्यातील मुळशी तालुक्यातील आहे. हत्या, खंडणी यांसारखे अनेक गंभीर आरोप त्याच्यावर दाखल आहेत. पप्पू गावडे आणि अमोल बाधे यांच्या हत्येप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. यात त्याला न्यायालयाने कारागृहाची शिक्षाही ठोठावली होती.

हे ही वाचा:

आमचे ऑफिस तुमच्या बाथरूमपेक्षा…Prakash Ambedkar यांची BJP आणि Congress वर घणाघाती टीका

Maratha Reservation मिळवल्याशिवाय माघार नाही, Manoj Jarange Patil यांचे Maha Govt ला आव्हान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss