Pune news  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड बंद

 Pune news  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज पिंपरी चिंचवड बंद

 Pune news : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वारंवार केले जाणारे आक्षेपार्ह विधान थांबविण्यासाठी भाजप सोडून इतर सर्व संघटनांनी आज (गुरुवार) ०८ डिसेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड बंदची हाक दिली आहे. त्यामुळे आज सकाळपासून पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. आज सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होणार आहे. विविध राजकीय पक्ष, समविचारी संघटना आणि संस्थांनी या बंदला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा : 

Gujarat, Himachal Election Result 2022 गुजरातमध्ये भाजप १५० जागांवर पुढे, तर हिमाचलमध्ये काँग्रेस देतोय तोडीस तोड स्पर्धा

तर या बंदला संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. दुपारी साडे बारा वाजता ते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. ते ज्या मंचावरुन संबोधित करणार आहेत, तो मंच सज्ज झाल आहे. संभाजीराजे या मंचावरुन काय बोलणार याकडे सर्व राज्याचे लक्ष असून या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भगतसिंह कोशारींनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यभरात वातावरण पेटलं आहे. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. राज्यपालांना हटवा, अशी मागणी करण्यात आली मात्र अजूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आहे. त्यामुळे भाजपविरोधात देखील सगळे पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.

Gujarat Election Result 2022 गुजरातमध्ये भाजपनं शतक गाठलं १२२ तर, काँग्रेस – ४७ व आप – ३ 

सामाजिक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, कष्टकरी संघर्ष महासंघ. एमआयएम. मूलनिवासी मुस्लिम मंच, जमाते उलेमा, काँग्रेस, आप, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी, बौद्ध समाज विकास महासंघ, मराठा क्रांती मोर्चा, आझाद समाज पक्ष, राष्ट्रीय इसाई महासंघ, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, कष्टकरी संघटना महासंघ, बहुजन सम्राट सेना, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, भारतीय बौद्ध महासभा, भीमशाही युवा संघटना, अपना वतन संघटना, बारा बलुतेदार महासंघ, फेरीवाला हॉकर्स महासंघ, ओबीसी संघर्ष समिती आदी संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

Himachal Pradesh Assembly Election 2022 हिमाचलमध्ये भाजपला काँग्रेसची ‘काँटे की टक्कर’ भाजप ३६ तर काँग्रेस…

Exit mobile version