PM Modi Pune Visit Cancelled: मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा Pune दौरा रद्द

PM Modi Pune Visit Cancelled: मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा Pune दौरा रद्द

PM Modi Pune Visit Cancelled: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून गुरुवार 26 सप्टेंबर रोजी पुणे मेट्रोच्या सिविल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार होते. परंतु, मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द करण्यात आला आहे. पुणे मेट्रोच्या सिविल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचा सोहळा पार पडल्यानंतर एस. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. कालपासून मुंबईमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेवर बसण्याची शक्यता वर्तवली आली होती. पुण्यामध्ये बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सभेसाठी उभारण्यात आलेले मंडप ओले झाले आहे. स्टेजवर येण्याचा मोदींचा जो मार्ग होता, त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. म्हणूनच, कालपासून पंतप्रधान मोदींची सभा पार पडेल की नाही याबाबतची शंका उपस्थित केली जात होती. अशातच, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

पावसाची सध्याची स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेचे ठिकाण बदलले जाऊ शकते, अशी माहिती देण्यात आली होती. पुणे दौऱ्याच्या निमित्ताने वाहतूक विभागाकडून वाहतूक मार्गामध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले होते. पावसामुळे तारांबळ उडू नये यासाठी आयोजकांनी सभेचे ठिकाण बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पुण्यामधील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडू शकते अशी शक्यता वर्तवली जात होती.

पुणेकरांच्या सुखकर व सुलभ प्रवासासाठी पुणे मेट्रोचा आणखी एक टप्पा लवकरच सुरू होणार आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार होता. त्यांच्या पुणे दौऱ्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेत संपूर्ण उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली होती.  नरेंद्र मोदी हे शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवरून स्वारगेटपर्यंत मेट्रोनं प्रवास करून त्या मार्गाचं उद्घाटन करणार होते. उद्घाटनानंतर पुण्यातील एस.पी. महाविद्यालयाच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती.

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरचा आदेश देण्यात आला होता का? Congress प्रवक्त्याचा CM Eknath Shinde, Devendra Fadnavis यांना सवाल

Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर होऊच शकत नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धरले धारेवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version