PM Modi Pune Visit: मुसळधार पाऊस आणि मोदींची सभा; सभेचे स्थान बदलण्याची शक्यता, कुठे होणार कार्यक्रम?

PM Modi Pune Visit: मुसळधार पाऊस आणि मोदींची सभा; सभेचे स्थान बदलण्याची शक्यता, कुठे होणार कार्यक्रम?

PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून गुरुवार 26 सप्टेंबर रोजी पुणे मेट्रोच्या सिविल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर एस. पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. कालपासून मुंबईमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यामध्ये बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी दिवसभर जोरदार पाऊस झाला. त्यामुळे एस.पी. महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सभेसाठी उभारण्यात आलेले मंडप ओले झाले आहे. स्टेजवर येण्याचा मोदींचा जो मार्ग होता, त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. म्हणूनच, कालपासून पंतप्रधान मोदींची सभा पार पडेल की नाही याबाबतची शंका उपस्थित केली जात आहे.

पावसाची सध्याची स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सभेचे ठिकाण बदलले जाऊ शकते. पावसामुळे तारांबळ उडू नये यासाठी आयोजकांनी सभेचे ठिकाण बदलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुण्यामधील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडू शकते. या सभागृहाची आसन क्षमता जास्त आहे, त्यामुळे जर वेळ पडली तर या ठिकाणी सभा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान खात्याकडून गुरुवारी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी पुण्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे आणि त्यामुळेच शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच, पुण्यामध्ये पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने वादळ व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा असून या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने उपाययोजना म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना २६ सप्टेंबर २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. 

हे ही वाचा:

Akshay Shinde Encounter: एन्काऊंटरचा आदेश देण्यात आला होता का? Congress प्रवक्त्याचा CM Eknath Shinde, Devendra Fadnavis यांना सवाल

Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर होऊच शकत नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धरले धारेवर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version