पुण्यातील हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी केली मोठी कारवाई

पुणे (Pune) हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पण आता पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. याच पुण्यात मागील काही महिन्यानापासून खून, हत्या ,रेप होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

पुण्यातील हॉटेलवर छापा टाकत पोलिसांनी केली मोठी कारवाई

पुणे (Pune) हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पण आता पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. याच पुण्यात मागील काही महिन्यानापासून खून, हत्या ,रेप होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये एका बांगलादेशी महिलेचा देखील समावेश आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने या हॉटेलवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. लोणीकंद परिसरामधील मनोरा लॉजिंग अँड बोर्डिंग अँड रेस्टॉरंटमध्ये हा छापा टाकला आहे.

पुण्यात वारंवार अशा घटना घडत आहेत. प्रज्योत हिरीअण्णा हेगडे (वय २७, रा. पेरणे फाटा, लोणीकंद) आणि गिरीश शाम शेट्टी (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची नावे आहेत . याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस कर्मचारी रेश्मा कंक यांनी ही तक्रार नोंदवली होती. लोणीकंद येथील हॉटेल मनोरामध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालत होतो. पोलीस अधिकाऱ्यांना तेथील काही खबरींनी माहिती दिली होती. त्यानंतर फेक कस्टमर पाठवून या घटनेचा सापळा रचला आणि हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात तीन महिला या पश्चिम बंगालच्या असल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलिसांनी या मसाज सेंटरवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित तरुणींची सुटका केली होती. पुण्यातील वानवडी येथील साळुंखे विहारमध्ये उच्चभ्रू परिसरातील गिरमे हाईट्समध्ये ‘गोल्डन टच स्पा’ नावाचा मसाज सेंटर चालवण्यात येत होता. या कारवाईत एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. व्यवस्थापक झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (२७., कोंढवा) आणि सुमित अनिल होनखंडे (२१) अशी अटक करण्यात आली होती.वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version