spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध , आंदोलन

मणिपूर हिंसाचार प्रकरणी एक धक्कादायक घटना समोर आली. एका जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवलंय. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर संबंधित महिलांवर सामूहिक बलात्कारही करण्यात आल्याचा आरोप आहे.

मणिपूर हिंसाचार प्रकरणी एक धक्कादायक घटना समोर आली. एका जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावरून फिरवलंय. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर संबंधित महिलांवर सामूहिक बलात्कारही करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळलीय. मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किलोमीटरवर कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजीची ही घटना आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याला कांगपोकपी पोलिसांनी अटक केली आहे.

भारतात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत त्यांच्यावर सतत अत्याचार आणि जीवघेणे हल्ले होत आहेत. ज्या लोकांचा मतांवर आपण सत्ता उपभोगत आहात, ज्यांच्या टॅक्सच्या पैशावर हा देश चालतो, त्या लोकांची जर आपण रक्षा करू शकलो नाही, तर हे आपण चालवत असलेल्या शासनाचे अपयश आहे, अशा प्रकारे शासन करणाऱ्या चालविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. मणिपुरमध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या (Manipur Violance) निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रावादीचे नेते आणि कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी हे आंदोलन पुकारलं होत. मोठ्याने घोषणाबाजीदेखील करण्यात आली. अटक झालेल्या दोघांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

देशाची राजसत्ता उपभोगत जगभर डंका पिटनारे मोदी सरकार मात्र हातावर हात ठेऊन बसले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे. या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काकासाहेब चव्हाण, डॉ.सुनील जगताप, मृणालिनीताई वाणी, सुषमा सातपुते, शिल्पाताई भोसले, किशोर कांबळे, विक्रम जाधव, उदयजी महाले, आप्पासाहेब जाधव, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, रोहन पायगुडे, फहीम शेख, मंगेश मोरे, हेमंत बधे, सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यासोबतच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्यावतीने मणिपूरच्या हिंसाचार घटनेविरोधात आंदोलन केलं. त्यावेळी महिलांनी भाजपनेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. आता कुठे नेऊन ठेवला तुमचा भारत, असं म्हणत महिला आक्रमक झाल्या. त्यांनी पुण्यातील अभिनव चौकात आंदोलन केलं. भाजप या सगळ्या घटनेवर मौन का पाळत आहे?, मणिपूरचं सरकार बरखास्त करा, अशी मागणी करत मोठ्याने घोषणाबाजी केली.

हे ही वाचा:

कोल्हापुरात पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल

कस्टमची आजवरची सर्वात मोठी कारवाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss