Pune airport, विमानाच्या पायऱ्यांवरून पडून सुरक्षा अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

देशातील अपघातांचे (accidents) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यातच आता पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना पुण्यातील लोहगाव विमातळावरील आहे

Pune airport, विमानाच्या पायऱ्यांवरून पडून सुरक्षा अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

देशातील अपघातांचे (accidents) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यातच आता पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना पुण्यातील लोहगाव विमातळावरील आहे.ही दुर्दैवी घटना विमानतळावरील पाहणी करण्यासाठी आलेल्या सुरक्षा अधिकारासोबत घडलेली आहे.या घटनेत त्याचा जागीच मृत्यू (death) झालेला आहे.

पुण्यातील लोहगाव विमानतळावर धक्कादायक घटना घडली असून विमानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा मृत्यू (death) झाला आहे. झाले असे की,लोहगाव विमानतळावर विमानातून प्रवासी उतरल्यानंतर विमानाची दारे बंद झाली की नाही हे पाहताना एका सुरक्षा अधिकाऱ्याचा विमानाच्या शिडीवरून (ladder)खाली पडून दुर्दैवी मृत्यू(death) झाला आहे .रोजी दरम्यान, या घटनेप्रकरणी एअर एशिया(Air Asia) विमान कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलीस अधिकाऱ्याने( Police officers) दिलेल्या माहितीनुसार विवियन अँथोनी डोमनिक (वय.३३, रा. लोहगाव, मूळ रा. तामिळनाडू) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा अधिकाऱ्याचे नाव आहे. सुरक्षेची पुरेशी काळजी न घेता दुघर्टनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एअरएशिया (Air Asia) कंपनीचे सुरक्षा व्यवस्थापक एस. अजय हरिप्रसाद (रा.लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल (File a case) करण्यात आला आहे. याबाबत विवियन डोमनिक यांची पत्नी अवली फ्रान्सकेन विवियन (वय २९, रा. तामिळनाडू ) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात कंप्लेंट (complaint) दाखल केली आहे.ही घटना १३ एप्रिल घडली होती.तामिळनाडूतील मूळगावी अँथोनी डोमनिक यांचा अंत्यविधी पार पडला. त्यानंतर त्यांची पत्नी अवली पुण्यात आली. त्यांनी नुकतीच विमानतळ पोलीस ठाण्यात कंप्लेंट(complaint) केली आहे.विमान कंपनीतील कर्मचाऱ्यांना सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना (accident) घडल्याचे अवली यांनी कंप्लेंटमध्ये म्हटले आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक बी. बी. वाकडे या घटनेचा तपास करत आहेत.

हे ही वाचा:

Mumbai-Pune Express way वरील खंडाळा घाटामध्ये ऑईल टँकरला आग

शरद पवारांनी दिला इशारा, तटकरे, पटेल यांच्यावर…

‘OMG 2’ चित्रपटाचे poster रिलीज, लवकरच Teaser होणार रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version