spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune News महापुरुषांच्या अवमानकारक विधानाविरोधात पुणे बंद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Pune News : आज दिनांक १३ डिसेंबर २०२२ रोजी पुणे बंदची हाक देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली असून यात खासदार उदयनराजे भोसले हे देखील आज या बंदच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या मोर्चात सामील होणार आहेत. पुण्यात या बंदच्या पार्श्वभूमीवर मोर्चा देखील काढण्यात येणार असून डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा निघेल. यानंतर लाल महाल याठिकाणी मोर्चाचा समारोप केला जाणार आहे. विविध संघटनांनी आजच्या पुणे बंदला पाठिंबाही दिला आहे. दरम्यान, आज पहाटेपासून पुण्यातील बंदला नेमका कसा प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासूनच पुण्यातील मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट आहे.

हेही वाचा : 

गुंगा गुड्डा विजयी भवः …!

त्याचबरोबर आज पुण्यात रिक्षा, आणि पुण्यातील पीएमपीएमएल बसही बंद ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गृहरक्षक दलाचे जवान, शहर पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, यांच्यासह स्थानिक पोलीस ठाणे, गुन्हे शाखेची पथकांचा बंदोबस्त या मोर्च्याच्या वेळी असणार आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं देखील या मोर्च्यावर लक्ष ठेवणार आहे. तसेच कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौक, मार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहालपर्यंत हा मूकमोर्चा जाणार आहे. त्यामुळे या मार्गावर देखील मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

थंडीत स्ट्रॉबेरी खाण्याचे फायदे माहित आहेत का ?

पुण्यातील या मोर्च्यामध्ये छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. यामध्ये स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. त्याचबरोबर पुण्यातील ३६ गणेशोत्सव मंडळे, व्यापारी संघटनेचे कार्यकर्तेदेखील सहभागी होणार आहे आणि स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Latest Posts

Don't Miss