spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune Bandh पुण्यातील मोर्चात मुस्लिम बांधव शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि आंबेडकरांचे पोस्टर घेऊन सहभागी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त विधानं केली होती. यानंतर अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. याच पार्श्वभूमीवर आज १३ डिसेंबर २०२२ रोजी मंगळवारी पुणे बंदची (Pune Bandh) हाक देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबतत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे. हा मोर्चा सकाळी ९ वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून टिळक चौकातून लक्ष्मी रोडने उलट मार्गे बेलबाह चौका-डावीकडे वळून शिवाजीरोडने उलट मार्गे जिजामात चौक, लाल महल इथे समाप्त होणार आहे.

हेही वाचा : 

Ved Movie Trailer Out बहुप्रतीक्षित ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, चाहत्यांची सिमेना पाहण्याची उत्सुकता शिगेला

पुण्यातील सर्व पक्षीय बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. मूक मोर्चाला सुरुवात होऊन या मोर्चात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले सहभागी झालेत उदयनराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांना पत्रही पाठवले होते. त्याचबरोबर या मोर्चात काही मुस्लिम बांधव देखील सहभाही झाले आहेत. त्यांनी हातात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर घेतले आहेत.

पुणे बंद

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येत असल्याने पुणे जिल्ह्यातील इंधन पंप उद्याही सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप मालकांनी पोलिसांना पत्र लिहून संरक्षणाची मागणी केली आहे. अहवालानुसार, किराणा, बेकरी आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने यासारख्या अत्यावश्यक सेवा उद्या सकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहतील आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत बंद पाळतील. बंद दरम्यान वैद्यकीय दुकाने सुरू राहणार आहेत. तर पुणे बंदला पाठिंबा देण्यासाठी उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने, बाजारपेठा बंद राहणार आहेत.

NCP Chief Sharad Pawar अज्ञात व्यक्तीकडून पवारांना जीवे मारण्याची धमकी

या मोर्च्यात छत्रपती उदयनराजे महाराज, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी नेते सहभागी होणार आहेत तसेच ते जाहीर सभेतही बोलणार आहेत. यात स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित असणार आहे. त्यासोबतच पुण्यातील ३६ गणेशोत्सव मंडळानेदेखील या बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते देखील मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता आहे. व्यापारी संघटनेचे कार्यकर्तेदेखील सहभागी होणार आहे आणि स्थानिक नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Agnipath Scheme ही योजना ऐच्छिक आहे, ज्यांना समस्या आहेत त्यांनी सहभागी होऊ नये, ‘अग्निपथ’बाबत न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

Latest Posts

Don't Miss