Pune By-Poll Results 2023 LIVE Updates, पुण्यातील जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या प्रत्येक अपडेट

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक या पहिल्या दिवसापासून वादात आहे. या दोन्ही निवडणुकीच्या प्रचार सभेत कधी वाद झाले तर निवडणुकीच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील कऱण्यात आले.

Pune By-Poll Results 2023 LIVE Updates, पुण्यातील जनतेचा कौल कुणाला? जाणून घ्या प्रत्येक अपडेट

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक या पहिल्या दिवसापासून वादात आहे. या दोन्ही निवडणुकीच्या प्रचार सभेत कधी वाद झाले तर निवडणुकीच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील कऱण्यात आले. या दोन्ही ठिकाणी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान हे पार पाडले आहे. तर आज दिनांक २ मार्च रोजी या मतमोजणी होत आहे. चिंचवड या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे आज मतदार राजानं कोणाच्या बाजूनं कौल दिलाय, हे आज स्पष्ट होणार आहे.

 

कसब्यात मतमोजणीच्या २० फेऱ्या तर चिंचवडमध्ये ३७ फेऱ्या –

पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक या दोन्ही निवडणूक मोठ्या प्रमाणत चर्चेत आहेत. आज सकाळी ८ वाजल्यापासून भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे मतमोजणीला सौरवत ही झाली आहे. त्यासाठी मतमोजणीच्या २० फेऱ्या होणार आहे. तर चिंचवडमध्ये सकाळी आठ वाजेपासून थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे होणार आहे. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत.

हे ही वाचा :

MIM कडून ‘मिशन महापालिका’च्या अनुषंगाने हालचाली सुरू, ते तीन पक्ष कोणते खुलासा होणार का??

पोलिसांविरोधात गावकरी बसले उपोषणाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version