Pune Bypoll election, पुण्यात जोरदार बॅनरबाजी, नागपूरची गुलामी, ठाण्यातून गद्दारी…!

गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी हि सुरु आहे. आणि अखेर या निवडणुकांचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप (pimpri chinchwad bjp candidate) आणि अपक्ष राहुल कलाटे या तिघांमध्ये चांगलीच रस्सीघेच ही सुरु आहे.

Pune Bypoll election, पुण्यात जोरदार बॅनरबाजी, नागपूरची गुलामी, ठाण्यातून गद्दारी…!

गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकांची रणधुमाळी हि सुरु आहे. आणि अखेर या निवडणुकांचे चित्र हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi) उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप (pimpri chinchwad bjp candidate) आणि अपक्ष राहुल कलाटे या तिघांमध्ये चांगलीच रस्सीघेच ही सुरु आहे. राहुल कलाटे यांनी मागहर नाही घेतली म्हणून त्यांच्यावर आता निशाणा हा साधला जात आहे.

चिंचवडचे महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे (Rahul kalate) यांनी बंडखोर केली. त्यांनी या निवडणुकीतून माघार न घेतल्याने त्यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनर्स वर त्यांच्यावर चांगलंच निशाण हा सदजला आहे. परंतु आता या बॅनरमुळे पिंपरी चिंचवडच्या राजकारणाने एक वेगळंच वळण घेतलं आहे असे दिसून येत आहे. राहुल कलाटेंच्या या बंडखोरीच्या मागे भाजपचा हात असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून सांगण्याता प्रयत्न केला जात आहे. हा बॅनर चिंचवड मतदार संघात लावण्यात आला आहे. त्यात ‘एका पक्षाची उमेदवारी खोक्यातून, नागपूरची गुलामी, ठाण्याची गद्दारी एकदम ओक्के डोक्यातून’, असं त्या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे.

चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. शिवसेना नेते संजय राऊत, सचिन आहिर, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सुनील शेळके यांनी राहुल कलाटेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली होती. शिवाय काही दिसवांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर मुंबईहून थेट चिंचवडला पोहोचले होते. त्यांनी तब्बल अर्धा तास राहुल कलाटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चाही करून दिली. मात्र, तरीही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यानंतर त्यांच्या या बंडखोरी मागचा मास्टरमाईंड कोण? अशा चर्चा रंगल्या. याच दरम्यान या बॅनरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बंडखोरीचं कारण काय?

२०१९ मध्ये राहुल कलाटे हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात अपक्ष लढले होते. त्यावेळी त्यांना लाखांमध्ये मतं मिळाले होते. यात काही हजारांच्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. सध्या राष्ट्रवादीकडून उमेदवार असलेल्या नाना काटेंनादेखील राहुल कलाटेंपेक्षा कमी मतं मिळाले होते. त्यामुळे राहुल कलाटेंना नागरिकांचं मोठं समर्थन असल्याचं समोर आलं आहे. या वेळीदेखील यात समर्थकांच्या जोरावर त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : 

शशिकांत वारिसे हे राजकीय नेत्यांच्या डोळ्यात खूपत होते, संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

मोदी – शाह यांच्या दौऱ्यावर शरद पवारांची खोचक टीका

Raj Thackeray यांचा आज औरंगाबाद दौरा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version