Saturday, July 6, 2024

Latest Posts

Pune Car Accident: त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, Ravindra Dhangekar यांची प्रतिक्रिया

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police) (CBI) ससून रुग्णालयातील (Sasoon Hospital) दोन वरिष्ठ डॉक्टर्सना ताब्यात घेतले आहे. यावर आता पुण्याचे खासदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे कार अपघातप्रकरणी (Pune Car Accident) आता एक मोठी अपडेट आली असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police) (CBI) ससून रुग्णालयातील (Sasoon Hospital) दोन वरिष्ठ डॉक्टर्सना ताब्यात घेतले आहे. आपल्या पोर्शे कारने दोन जणांना चिरडणाऱ्या (Pune Hit and Run Case) बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा नियम कायदे मोडून कशाप्रकारे कामाला लागली याचा आणखी एक पुरावा समोर आला आहे. बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचा मुलगा आणि या प्रकरणातील मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांवर मदत केल्याचा आरोप झाला होता. आता यात ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर्सही सामील असल्याचे समोर आले असून गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले आहे. यावर आता आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत.जे आता हळू हळू जगासमोर येतील,’ असे त्यांनी म्हंटले आहे.

रवींद्र धंगेकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या २ डाॕक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्ट मधे फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा ७ दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच ससून मध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा आमची अँब्युलन्स येत आहे,अशी विनंती केली होती.मात्र रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. असो,हे वाटतं तेव्हढ सोप्पं नाहीये. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत.जे आता हळू हळू जगासमोर येतील.”

गुन्हे शाखेने डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर या दोन डॉक्टर्सना ताब्यात घेतलं असून कायदयाच्या तावडीतून बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा आरोप या डॉक्टर्सवर करण्यात आला आहे. आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये फेरफार झाल्याचे उघड झाले असून पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

येरवडा पोलिसांनी घटनेच्या तब्बल ९ तासांनंतर अल्पवयीन आरोपीने मद्यप्राशन केले होते कि नाही हे तपासण्यासाठी ससून रुग्णालयात आरोपीच्या रक्ताचे नमुने घेतले होते. यावेळी आरोपी दोषी ढळू नये म्हणून डॉक्टर्सकडून आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर एकाच खळबळ उडाली असून धनिकपुत्राला वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कश्याप्रकारे गैरकृत्य करते हे समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या डॉक्टर्सना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. दुपारी त्यांना शिवाजीनगर न्यायालयात हजार करण्यात येईल.

हे ही वाचा:

कोकण पदवीधर मतदार संघातून उमेदवारी कोणाला? CM SHINDE यांचा निर्णय काय?

…म्हणून केले निबंध स्पर्धेचे आयोजन, Ravindra Dhangekar यांचा खुलासा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss