PUNE: PMP BUS च्या मार्गात बदल, कोणत्या मार्गाने बस जाणार ?

PUNE: PMP BUS च्या मार्गात बदल, कोणत्या मार्गाने बस जाणार ?

पुणे महानगरपालिकेच्यावतीने (PUNE MUNICIPAL CORPORATION) पादचारी दिनाच्या निमिताने आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर रोजी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर ‘वॉकिंग प्लाझा’ होणार असल्याने या मार्गावर सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेदरम्यान पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस बंद राहणार आहेत. या मार्गावरून धावणाऱ्या बस दुसऱ्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

लक्ष्मी रस्त्यावर उंबऱ्या गणपती चौक ते गरूड गणपती चौक असा हा ‘वॉकिंग प्लाझा’ होणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरून बऱ्याच पीएमपीच्या बस धावतात; पण सोमवारी आता या मार्गावरील पीएमपी बस (PMP BUS) अन्य मार्गांनी वळविण्यात येणार आहेत.  बस मार्ग क्रमांक ५५, ५८, ५९ शनिपारकडे येताना कुमठेकर रस्त्यामार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, टिळक चौकातून पुढे जाणार आहेत. तर बस मार्ग क्रमांक ५७ पुणे स्टेशनकडून जाताना बस मार्ग क्रमांक ९४ नारायण पेठमार्गे टिळक चौक मार्गाने पुढे नियमित जाणार आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेली ‘अटल’, ‘पुण्यदशम्’चे सात व नऊ क्रमांकाचे दोन मार्ग बंद राहणार आहेत.

तसेच, बस मार्ग क्रमांक ८१, १४४, १४४ अ, १४४ क व २८३ या मार्गावरील बस पुणे स्टेशनकडे जाताना नियमित मार्गाने व पुणे स्टेशनकडून येताना मनपाच्या मार्गाने धावणार आहेत. बस मार्ग क्रमांक १७४ पुणे स्टेशनकडून ‘एनडीए’कडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित व पुढे स्वारगेट, सारसबाग, टिळक रस्ता, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने सुरु राहणार आहेत तर ‘एनडीए’कडून पुणे स्टेशनकडे येताना या मार्गावरील बस नियमित मार्गाने जाणार आहेत. बस मार्ग क्रमांक ६८ या मार्गावरील बस अप्पर डेपोकडे जाताना नियमित मार्गाने व अप्पर डेपोकडून सुतारदराकडे येताना टिळक रस्त्यामार्गे संचलनात राहतील. तर बस मार्ग क्रमांक १९७ व २०२ या मार्गांवरील बस हडपसरकडून कोथरूड डेपो / वारजे माळवाडीकडे जाताना सिटी पोस्टपर्यंत नियमित. पुढे स्वारगेट, सारसबाग, टिळक रस्ता, डेक्कन कॉर्नर व पुढे नियमित मार्गाने. कोथरूड डेपो, वारजे माळवाडीकहून हडपसरकडे जाताना बस नियमित मार्गाने संचलनात राहणार आहेत.

हे ही वाचा:

पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील चार विद्यार्थिंनीचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू

लोकलने प्रवास करताय? तर ‘ही’ आनंदाची बातमी खास तुमच्यासाठी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version