मराठा आरक्षण्याच्या पार्श्ववभूमीवर आज पुणे शहर बंद

जालना आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर पडले आहेत. मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

मराठा आरक्षण्याच्या पार्श्ववभूमीवर आज पुणे शहर बंद

जालना आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभर पडले आहेत. मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मनोज जरांगे यांना पाठींबा देण्यासाठी पुण्यातील ‘मराठा क्रांती मोर्चा’ च्या वतीने आज पुण्यात बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. या बंद मध्ये पुण्यातील काही ठिकाण संपूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. त्यात औंध, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण या परिसराचा समावेश आहे. या परिसरात एक दिवसाचे उपोषण करण्यात येणार आहे. औंध, बाणेर, बालेवाडी आणि पाषाण परिसरत सगळीकडे शांतता पाहायला मिळत आहे. या बंद मध्ये अनेक दुकानदार, व्यापारी यांचा देखील समावेश आहे. तर काही ठिकाणात शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

मराठा क्रांती मोर्चकडून सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण केले जात आहे. पुण्यातील महात्मा फुले मंडई जवळ हे उपोषण केले जाणार आहे. तर शहरातील काही शाळा आणि महाविद्यालय सुरु ठेवण्यात आल्या आहेत.शहरात आजपासून हिंदी भाषा संमेलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक सुरु होणार आहे. या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर सकाळपासूनच प्रत्येक चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. PMPML बस सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. या बंदमध्ये दुकानं, हॉटेल्स बंद ठेवण्यात आले आहेत. व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नसून फक्त आवाहन करत आहोत. उत्स्फूर्तपणे ज्या नागरिकांना बंदमध्ये सहभागी व्हायचं आहे. त्यांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं, असं मराठा मोर्चांच्या सदस्यांकडून सांगण्यात आलं आहे. या बंदला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या बंदमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित घटना घडू नये, यासाठी शहरातील प्रत्येक चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शिवाय मंडई परिसरातदेखील उपोषणाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे ही वाचा: 

गणपतीसाठी विमानाने गावी जाणाऱ्यांचे हाल

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडेचार कोटी रुपयांचं सोनं जप्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version