पुण्यात जादूटोणा प्रकरणाचा कहर! सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं

पुणे हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. परंतु सध्या पुण्यात गुन्हेगारीचे स्वरूप हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे.

पुण्यात जादूटोणा प्रकरणाचा कहर! सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं

पुणे हे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. परंतु सध्या पुण्यात गुन्हेगारीचे स्वरूप हे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. परंतु आज पुण्यात एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. विवाहित (Black magic) महिलेचं मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. २७ वर्षीय पीडित महिलेने या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे

सासरच्या मंडळींनी सुंचये मासिक पाळीचे रक्त विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मासिक पाळी सुरू असताना महिलेचा छळ करून अघोरी कृत्य केल्याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तिचा पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, म्हाधू कथले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तींवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादूटोणा प्रती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील सर्वात धक्कादायक बाबा म्हणजे हा प्रकार २०१९ पासून सुरु होता. तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि पीडित महिला पुण्यातील विश्रांतवाडी भागात राहायला असून तिचे वय हे २७ वर्ष आहे. २ वर्षांपूर्वी तिने प्रेम विवाह हा केला होता. परंतु नंतर सासऱ्या मंडळींनी तिचा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. अघोरी विद्येच्या नादात सासरच्या मंडळींनी पीडित महिलेच्या मासिक पाळी दरम्यान तिचे हातपाय बांधून तिचे मासिक पाळीचे रक्त कापसाने काढून ते बाटलीत भरुन ५० हजार रुपयांना जादूटोण्यासाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार घडला. घडलेली घटना या पीडित महिलेने तिच्या आई वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली.

हे ही वाचा :

पु.ल.देशपांडे कला अकादमीत स्त्री शक्तीचा लोकजागर

विरोधी पक्षनेते अजित पवार जातीच्या राजकारणावरुन सभागृहात आक्रमक

राऊतांनी मनसेला डिवचले, त्यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version