Thursday, July 4, 2024

Latest Posts

Pune Drugs Case: केंद्रीय मंत्री Muralidhar Mohol यांच्या कडक सूचना, आयुक्त Amitesh Kumar यांच्या आदेशावरून Pune Police ॲक्शन मोडवर

Pune Drugs Case: पुण्यातील अमली पदार्थ सेवन करणाऱ्या मुलांचा व्हिडीओ वायरल (Pune Drugs Viral Video) झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी याप्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Pune Drugs Case: पुण्यातील अमली पदार्थ सेवन करणाऱ्या मुलांचा व्हिडीओ वायरल (Pune Drugs Viral Video) झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात (Pune News) अल्पवयीन मुलेसुद्धा ड्रग्स घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण देखील तापले असून विरोधकांनी राज्य सरकारवर (Maharashtra Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. यावरून पुणे पोलिसांनी (Pune Police) काल (रविवार, २३ जून) दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. मात्र पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी याप्रकरणाची दखल घेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. त्यानुसार मुरलीधर मोहोळ यांनी याप्रकरणावर बारकाईने लक्ष घालत पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच पुणे शहरात अमली पदार्थांविरोधात पुणे पोलिसांची स्वतंत्र मोहीम देखील सुरु करण्यात आली आहे. यासाठी मनुष्यबळ आणि स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याची सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केली आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या सूचनांनुसार पुण्यातील सर्व महाविद्यालये, पब्स, हॉटेल्स आणि इतर संशयास्पद ठिकाणी त्वरित शोधमोहीम सुरु करण्यात येणार आहे. पुण्यात उपलब्ध होणाऱ्या अमली पदार्थांच्या मुळाशी पोहोचण्याच्या सूचनादेखील मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या आहेत.

हे ही वाचा

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा एल्गार, हंगामी अध्यक्ष पॅनलवर टाकला बहिष्कार

Parliament Session 2024 : ‘इंडिया’ आघाडीचे खासदार संविधानाची प्रत घेऊन संसदेत का पोहोचले? राहुल गांधी म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss